​वाडा चिरेबंदीच्या टीमने केली लोणावळ्यात धमाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2017 14:21 IST2017-03-07T08:51:38+5:302017-03-07T14:21:38+5:30

कलाकारांना त्यांच्या व्यग्र शेड्युलमधून स्वतःसाठी वेळ देणे कठीण जाते. पण तरीही वाडा चिरेबंदी या नाटकातील कलाकार, लेखक, दिग्दर्शक, निर्माते ...

Vada Khera Bandywadi team made Lakhavali dhalam | ​वाडा चिरेबंदीच्या टीमने केली लोणावळ्यात धमाल

​वाडा चिरेबंदीच्या टीमने केली लोणावळ्यात धमाल

ाकारांना त्यांच्या व्यग्र शेड्युलमधून स्वतःसाठी वेळ देणे कठीण जाते. पण तरीही वाडा चिरेबंदी या नाटकातील कलाकार, लेखक, दिग्दर्शक, निर्माते यांनी सगळ्यांनी मिळून खूप धमाल मस्ती नुकतीच केली.
कोणताही कलाकार चित्रपट, नाटक अथवा मालिका यात काम करत असेल तर दिवसातील जास्तीत जास्त वेळ हा त्याला चित्रीकरणासाठीत द्यावा लागतो. मालिका करत असल्यास तर अधिकाधिका वेळ हा मालिकेच्या चित्रीकरणातच जातो. वाडा चिरेबंदी या नाटकाच्या सगळ्या टीमने आपल्या बिझी शेड्युलमधून वेळ काढून नुकतीच एक छान पिकनिक लोणावळ्याला आयोजित केली होती.
वाडा चिरेबंदी या नाटकातील प्रसाद ओक, निवेदिता जोशी-सराफ, नेहा जोशी, वैभव मांगले, चंद्रकांत कुलकर्णी, प्रतिमा जोशी, अजिंक्य ननावरे, पोर्णिमा मनोहर, श्रीपाद पद्माकर हे सगळेच नुकतेच लोणवळ्याला एकत्र फिरायला गेले होते. त्यावेळी त्यांनी खूप मजामस्ती तर केली. पण त्याचसोबत या नाटकाच्या पुढील वाटचालीबाबत आणि पुढील नाटकांबाबतदेखील चर्चा केली. याबाबत प्रसाद ओक सांगतो, "आमच्या नाटकाचे आता 200 हूनही अधिक प्रयोग झाले आहेत. आमच्या नाटकाचे ज्यावेळी 50, त्यानंतर 100 आणि त्यानंतर दीडशे प्रयोग झाले त्यावेळी नेहमीच आमच्या नाटकाच्या निर्मात्यांनीच आम्हाला पार्टी दिली होती. त्यामुळे यावेळी आम्ही त्यांना पार्टी देण्याचे ठरवले. आम्ही एक छोटेखानी पार्टी लोणावळ्यातील वनविहार येथे आयोजित केली. आमचा पुण्यातला प्रयोग झाल्यानंतर आम्ही थेट लोणावळ्याला गेलो. लोणावळ्याला रात्री धमाल केली. सकाळी आम्ही सगळ्यांनी मिळून पुढील वाटचालीबाबत चर्चा केली. त्यानंतर दुपारी पुन्हा आमचा वाशीला प्रयोग होता, त्या प्रयोगासाठी आम्ही सगळे निघालो."




Web Title: Vada Khera Bandywadi team made Lakhavali dhalam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.