विशेष चित्रपट क्लबच्यावतीने लहान मुलांसाठी अनोखा उपक्रम

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2017 13:00 IST2017-02-23T07:30:37+5:302017-02-23T13:00:37+5:30

लहान मुलांमध्ये चंदेरी दुनियेविषयी विशेष क्रेझ असते. मात्र या मुलांना चित्रपटाचा इतिहासचमाहिती नसते. या क्षेत्राविषयी ते पूर्ण अज्ञान असतात. ...

Unique Program for Kids by Special Film Club | विशेष चित्रपट क्लबच्यावतीने लहान मुलांसाठी अनोखा उपक्रम

विशेष चित्रपट क्लबच्यावतीने लहान मुलांसाठी अनोखा उपक्रम

ान मुलांमध्ये चंदेरी दुनियेविषयी विशेष क्रेझ असते. मात्र या मुलांना चित्रपटाचा इतिहासचमाहिती नसते. या क्षेत्राविषयी ते पूर्ण अज्ञान असतात. म्हणूनच एन.एफ.ए.आय. आणि अर्भाट फिल्म्स यांच्या संयुक्त विद्यमाने एक अनोखा उपक्रम राबविण्यात येणार आहे. तो म्हणजे, मुलांना चित्रपटाच्या अधिक जवळ आणण्यासाठी एका नवीन पुढाकारानुसार एक विशेष चित्रपट क्लब सुरू करण्यात येत आहे. दर महिन्याला चित्रपट स्क्रीनिंगद्वारे चित्रपटसृष्टीच्या वारश्याबद्दल परिचित करून देणे हे या चित्रपट क्लबचे उद्दिष्ट असणार आहे. हा क्लब ९ ते १६ वयोगटातील मुलांसाठी खुला होईल आणि चित्रपटाचे स्क्रीनिंग महिन्यातून एकदा शनिवार किंवा रविवार या दिवसांमध्ये आयोजित करण्यात येणार आहे. 
       
     पहिला स्क्रिनिंग चित्रपट हा निमार्ते सत्यजित रे यांच्या अनन्य राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त फिल्म सोनार केल्ला (१९७४), फेलुदा डीटेक्टीव मालिकेतून असून चित्रपट २५ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ४ ते ६ दरम्यान एन.एफ.ए.आय, कोथरूड येथे दाखवण्यात येणार आहे. तसेच आपल्या मुलांमध्ये चित्रपटाच्या जादूची जागरूकता रुजवण्यासाठी आणि त्यांची संवेदनशीलता वाढवण्याच्या हेतुने हा चित्रपट क्लब असून यामुळे एक पोषक चित्रपट संस्कृतीचा प्रसार करण्यात मदत करेल.
     
      या उपक्रमाविषयी एन.एफ.ए.आयचे दिग्दर्शक प्रकाश मगदुम सांगतात, मुलांना अभिजात चित्रपटांचा खजिना अनुभवण्यास मिळावा म्हणून हा उपक्रम सुरु करण्यात आम्हाला आनंद होत आहे. आम्हाला विश्वास आहे की या उपक्रमाद्वारे लहान वयातच चित्रपट संस्कृतीचा प्रसार होण्यात मदत होईल. आम्ही विविध शाळांना या उपक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी आमंत्रित केले आहे.
       
         मुलांनी जगातील महान चित्रपट पाहावेत ज्यामुळे त्यांची स्वभाववृत्ती प्रभावित होईल. एनएफएआय देशातील सर्व महत्त्वपूर्ण चित्रपट उपक्रमांचे केंद्र आहे आणि अर्भाट फिल्म्स या उपक्रमाद्वारे एन.एफ.ए.आय. सोबत काम करण्यास उत्सुक असल्याचे दिग्दर्शक आणि अर्भाट चित्रपटाचे संस्थापक उमेश कुलकर्णी यांनी सांगितले.  

Web Title: Unique Program for Kids by Special Film Club

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.