गणवेशचा ट्रेलर प्रदर्शित

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2016 14:12 IST2016-05-21T08:42:32+5:302016-05-21T14:12:32+5:30

शालेय जीवनात गणवेश हा प्रत्येकाचा जीव की प्राण असतो. त्यात १५ आॅगस्ट, २६ जानेवारी असेल तर गणवेश कसा अधिक सुंदर दिसेल याकडे प्रत्येकाचे लक्ष असते. कोणी नवीन गणवेश खरेदी करतो. तर कोणी कडक इस्त्री करून तुºयात स्वातंत्र्य दिन व प्रजासत्ताक दिन साजरा करतो. अशा वातावरणात एखादया शालेय विदयार्थ्याला परिस्थिती अभावी गणवेश खरेदी करता नाही आला तर त्या विदयार्थ्याच्या पालकाची होणारी धावपळ

Uniform Trailer Display | गणवेशचा ट्रेलर प्रदर्शित

गणवेशचा ट्रेलर प्रदर्शित

लेय जीवनात गणवेश हा प्रत्येकाचा जीव की प्राण असतो. त्यात १५ आॅगस्ट, २६ जानेवारी असेल तर गणवेश कसा अधिक सुंदर दिसेल याकडे प्रत्येकाचे लक्ष असते. कोणी नवीन गणवेश खरेदी करतो. तर कोणी कडक इस्त्री करून तुºयात स्वातंत्र्य दिन व प्रजासत्ताक दिन साजरा करतो. अशा वातावरणात एखादया शालेय विदयार्थ्याला परिस्थिती अभावी गणवेश खरेदी करता नाही आला तर त्या विदयार्थ्याच्या पालकाची होणारी धावपळ यावर आधारित असलेला अतुल जगदाळे दिग्दर्शित गणवेश या चित्रपटाचा नुकताच ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला.या चित्रपटाच्या ट्रेलर प्रदर्शनावेळी अभिनेता किशोर कदम, अभिनेत्री स्मिता तांबे, मुक्ता बर्वे, बालकलाकार तन्मय मांडे, दिग्दर्शक अतुल जगदाळे आणि चित्रपटाची टीम उपस्थित होती. २४ जूनपर्यत प्रेक्षकांना या चित्रपटाची वाट पहावी लागणार आहे.


Web Title: Uniform Trailer Display

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.