"घरच्यांनी लग्नासाठी नकार दिला असता तर आम्ही...", प्रिया आणि उमेशने केला मोठा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2025 10:57 IST2025-09-07T10:56:37+5:302025-09-07T10:57:00+5:30

प्रिया बापट व उमेश कामत यांनी लग्नापूर्वी घेतलेला 'हा' निर्णय

Umesh Kamat Priya Bapat Love Story Marriage Opinion On Live In Relationship | "घरच्यांनी लग्नासाठी नकार दिला असता तर आम्ही...", प्रिया आणि उमेशने केला मोठा खुलासा

"घरच्यांनी लग्नासाठी नकार दिला असता तर आम्ही...", प्रिया आणि उमेशने केला मोठा खुलासा

 Umesh Kamat Priya Bapat Love Story: मराठी चित्रपटसृष्टीतला प्रसिद्ध अभिनेता उमेश कामत आणि अभिनेत्री प्रिया बापट ( Priya Bapat And Umesh Kamat ) हे एक क्युट कपल म्हणून ओळखले जातात. २०११ साली दसऱ्याच्या दिवशी उमेश कामतप्रिया बापटलग्नबेडीत अडकले. त्याआधी बरीच वर्षे दोघं रिलेशनशिपमध्ये होते. रिलेशनशिपच्या सुरुवातीच्या काळात दोघांनी आपलं नात लपवून ठेवलं होतं. अनेक जण त्यांच्या प्रेमकहाणीबद्दल जाणून घेण्यासाठी उत्सुक असतात. नुकत्याच 'लोकमत फिल्मी'ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी त्यांच्या नात्याबद्दल एक मोठा खुलासा केला. जर त्यांच्या कुटुंबाने त्यांच्या लग्नाला नकार दिला असता, तर ते काय पाऊल उचलणार होते, याचा त्यांनी खुलासा केला.

'लोकमत फिल्मी'ला दिलेल्या मुलाखतीत त्यांना "आता जसं नात्याला तपासून पाहिलं जातं. आता अनेक जण लिव्ह-इनमध्ये राहतात, लग्नाआधी एकत्र राहून पाहतात. आता नात्याच्या व्याख्या बदलत आहेत. लग्न करण्यापुर्वी वेळ घेतला जातोय. जेव्हा तुम्ही प्रेमात पडलात, तेव्हा तेव्हाचा काळ कसा होता? असा प्रश्न विचारला. यावर प्रिया म्हणाली, "आम्ही काही प्रेमात पडलो आणि लगेच दोन दिवसात लग्न केलं असं नाही. लग्नीपूर्वी आम्ही ७-८ वर्षं एकत्र होतो. फक्त आम्ही लिव्ह-इनमध्ये राहात नव्हतो. पण, आम्ही वेळ घेतला होता".

उमेश म्हणाला, "पटकण ठरवलं आणि लग्न केलं असं काही नव्हतं. आम्ही घरी सांगण्यासाठीसुद्धा वेळ घेतला होता. मैत्री होणं, मग मैत्रीतून एकमेकांना आवडणं, तर खरंच तसं आहे की नाही, हे जाणून घेण्यासाठीसुद्धा वेळ घेतला. पण त्यावेळी आधी लिव्ह-इनमध्ये राहून बघूयात का, मग लग्न करू हे पर्याय आमच्या डोक्यात कधीच आले नाही.

उमेशने त्यांच्या नात्यातील सर्वात मोठा आणि महत्त्वाचा निर्णय सांगितला. तो म्हणाला, "तेव्हा आमच्या मनात असेच विचार होते की, लग्न करायचं. उलट आम्ही असं ठरवलेलं की, जर घरच्यांनी परवानगी नाही दिली आपल्या नात्याला. तर एकवेळ कुणाशीच लग्न करणार नाही. पण,  त्यांच्या मनाविरुद्ध किंवा पळून जाऊन वगैरे काही करायचं नाही, हा विचार आमचा होता. आई वडिलांना दुखवायचं नाही, हे आमच्या मनात होतं. बाकी आम्ही वेळ घेतला. जर त्यावेळी आम्हाला जाणवलं असतं की, आमची मतं, किंवा काही महत्त्वाच्या गोष्टींमध्येच साम्य नाहीये, तर कादाचित आम्ही पुढे गेलो नसतो".  प्रिया आणि उमेशच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर त्यांचा 'बिन लग्नाची गोष्ट' (Bin Lagnachi Gosht) हा सिनेमा १२ सप्टेंबर रोजी रिलीज होत आहे. 

Web Title: Umesh Kamat Priya Bapat Love Story Marriage Opinion On Live In Relationship

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.