'फॉरेनची पाटलीण' अभिनेत्याचा मुलगा दहावीत टॉपर, मिळाले 'एवढे' टक्के!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2025 09:22 IST2025-05-14T09:06:18+5:302025-05-14T09:22:55+5:30

सेलिब्रिटीचा मुलगा अभ्यासातही सुपरहिट, मिळवले तब्बल 'इतके' गुण!

Ude Ga Ambe Ude Fame Actor Girish Pardeshi Son Ssc Result 97 Percent | 'फॉरेनची पाटलीण' अभिनेत्याचा मुलगा दहावीत टॉपर, मिळाले 'एवढे' टक्के!

'फॉरेनची पाटलीण' अभिनेत्याचा मुलगा दहावीत टॉपर, मिळाले 'एवढे' टक्के!

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने काल मंगळवारी (दि. १३) दहावीचा निकाल जाहीर केला.  'फॉरेनची पाटलीण' या सिनेमात दिसलेला मराठी अभिनेता गिरीश परदेशी (Girish Pardeshi) च्या मुलानं दहावीत घवघवीत यश मिळवलं आहे. अभिनेत्याचा मुलगा शाळेत चौथा आला आहे.

अभिनेत्यानं मुलाला मिळालेले गुण आनंदानं सोशल मीडियावर पोस्ट करीत त्याच कौतुक केलं आहे. गिरीश परदेशीनं लेक क्रिशिवनं ९७.४० टक्के इतके गुण मिळवले आहेत. लेकाची गुणपत्रीका सोशल मीडियावर पोस्ट करत कॅप्शनमध्ये अभिनेत्यानं लिहलं, "अभिनंदन, तुझा आम्हाला खूप अभिमान आहे". शाळेत चौथा आल्यानंतर क्रिशिवचं शाळेच्या बोर्डावर नाव झळकलेलं पाहायला मिळालं. 

'या सुखांनो या', 'वहिनीसाहेब' अशा अनेक मालिकांमध्ये झळकलेल्या गिरीश परदेशीनं स्टार प्रवाहवरील 'उदे गं अंबे उदे' या मालिकेतून कमबॅक केलं होतं.  काही दिवसांपूर्वीच या मालिकेने काही काळासाठी प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. अभिनेता अभिनयाव्यतिरिक्त सोशल मीडियावरही सक्रिय असतो.  तो दैनंदिन आयुष्यातील अपडेट चाहत्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून देत असतो. गिरीश परदेशी यांच्या नव्या प्रोजेक्टची चाहते वाट पाहात आहेत.

Web Title: Ude Ga Ambe Ude Fame Actor Girish Pardeshi Son Ssc Result 97 Percent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.