निनावी पात्रांच्या मुखवटयांमागचे सत्य म्हणजे चौर्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2016 16:41 IST2016-07-23T11:11:44+5:302016-07-23T16:41:44+5:30
आपण सर्व कोणता ना कोणता मुखवटा घेऊन जगत असतो. या मुखवट्यामागील खरा चेहरा क्वचितच समोर येत असतो. हाच खरा ...
.jpg)
निनावी पात्रांच्या मुखवटयांमागचे सत्य म्हणजे चौर्य
आ ण सर्व कोणता ना कोणता मुखवटा घेऊन जगत असतो. या मुखवट्यामागील खरा चेहरा क्वचितच समोर येत असतो. हाच खरा चेहरा ‘चौर्य’ चित्रपटातून समोर आणण्याचा प्रयत्न दिग्दर्शक समीर आशा पाटील यांनी केला आहे. या चित्रपटात एक असं गाव आहे जिथे घरांना दरवाजे नाहीत. गावकºयांची श्रद्धा आहे की, तेथे चोरी करणाºया चोरांना देव शिक्षा करतो. मात्र, जेव्हा गावातील मंदिरातच दरोडा पडतो तेव्हा लोकांच्या श्रद्धेला तडा जातो आणि मग सुरू होतो चोर व श्रद्धेचा शोध.यावर आधारित असा हा चित्रपट असणार आहे. या चित्रपटात मिलिंद शिंदे, गणेश यादव, दिग्विजय रोहिदास, जयेश सांघवी, श्रुती कुलकर्णी, गणेश पानपट, तिर्था मुरबाडकर, निर्माते नीलेश नवलखा, संगीतकार मयुरेश केळकर या कलाकारांचा समावेश आहे. येत्या पाच आॅगस्ट हा चित्रपट संपूर्ण महराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.