r /> सणवार आले की महिलांना सजायची चांगलीच संधी मिळत असते. मग पारंपारिक वेशभूषेत नटलेल्या महिला सणांच्या माहोलमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. खरतर सजायची हौस तर प्रत्येक मुलीला आणि महिलांना असतेच. मग अशात आपल्या अभिनेत्री तरी काशाकाय मागे राहतील बरं. चित्रपटांमध्ये जरी या हिराईन्सना सुंदर-सुंदर कपडे घालायला मिळाले तरी व्यक्तिगत आयुष्यात खरे सणवार साजरे करणे म्हणजे वेगळेच असते. सध्या आपल्याकडे श्रावण महिना सुरू असून सणांची लगबग आहे. मग स्पृहा जोशीला देखील सणांसाठी मस्त पारंपारिक वेशात सजावेसे वाटले. तिने नूकताच सोशल मिडियावर अस्सल मराठमोळ््या अंदाजातील एक फोटो अपलोड केला आहे. या फोटोमध्ये स्पृहा फारच सालस दिसत आहे. लाल रंगाची भरजरी साडी, कपाळी चंद्रकोर, कानात झुमके, हातात हिरव्या बांगड्या, गळ््यात मोत्याच्या माळा, बाजुबंद अशा ठसकेबाज पेहरावामध्ये काढलेला हा फोटो अप्रतिम वाटत आहे. या फोटोबद्दल बोलताना स्पृहा सांगते, मला पारंपारिक लुकमध्ये रहायला फारच आवडते. सध्या सणांचा मोसम सुरू असल्याने मी अशा पारंपारिक वेशभुषेतील फोटो अपलोड केला आहे. ते काहीही असले तरी या फोटोत मात्र स्पृहा लय भारी दिसत आहे.
![]()