या फोटोतील अभिनेत्रीला ओळखा पाहू? Throwback फोटोने वेधले चाहत्यांचे लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2021 04:40 PM2021-09-29T16:40:34+5:302021-09-29T16:43:49+5:30

सोशल मीडियावर थ्रो बॅक फोटोचा ट्रेंड बराच रूढ झाला आहे. थ्रो बॅकच्या माध्यमातून जुने फोटो शेअर करत आठवणींना उजाळा दिला जातो. सेलिब्रिटी मंडळीसुद्धा थ्रो बॅक फोटोच्या माध्यमातून जुन्या आठवणी सोशल मीडियावरील आपल्या फॅन्ससह शेअर करत असतात.

Throwback Photo Of Supriya Pilgaonkar Caught Attention Of Everyone | या फोटोतील अभिनेत्रीला ओळखा पाहू? Throwback फोटोने वेधले चाहत्यांचे लक्ष

या फोटोतील अभिनेत्रीला ओळखा पाहू? Throwback फोटोने वेधले चाहत्यांचे लक्ष

googlenewsNext

चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध आणि अष्टपैलू अभिनेता म्हणजे सचिन पिळगावकर. मराठीच नाही तर हिंदी सिनेमातही त्यांनी आपल्या अभिनयाची जादू दाखवली आहे. अभिनयासह दिग्दर्शन, निर्मिती, गायन, नृत्य यातही सचिन पिळगावकर. सचिन पिळगावकर यांनी गेली अनेक दशकं आपल्या अभिनयाने रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवलं आहे. सचिन यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नी सुप्रिया पिळगावकर यांनीही मराठी, हिंदी सिनेमांसह मालिका तसंच रियालिटी शोमध्ये आपली जादू दाखवली आहे. 

सोशल मीडियावर थ्रो बॅक फोटोचा ट्रेंड बराच रूढ झाला आहे. थ्रो बॅकच्या माध्यमातून जुने फोटो शेअर करत आठवणींना उजाळा दिला जातो. सेलिब्रिटी मंडळीसुद्धा थ्रो बॅक फोटोच्या माध्यमातून जुन्या आठवणी सोशल मीडियावरील आपल्या फॅन्ससह शेअर करत असतात. याच फोटोद्वारे प्रत्येकजण भूतकाळातील आठवणीत रममाण होतो. असाच एक फोटो सुप्रिया पिळगांवकरन यांनीही सोशल मीडियावर शेअर केला होता. हा एकच नाही तर असे बरेच जुने फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केल्याचे तुम्हाला पाहायला मिळतील. 

सोशल मीडियावरही तितकीच एक्टिव्ह आहेत. खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यातील अपडेट्स सुप्रिया सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या फॅन्ससह शेअर करत असतात. आपल्या फॅन्ससह संवाद साधता साधता  त्यांच्यासह फोटो, आगामी प्रोजेक्टस्चे अपडेट्सही देत असतात.

आजही सुप्रिया पिळगांवकर चाहत्यांचे मनोरंजन करत असतात.वयाच्या ५३ व्या वर्षीही तरुणींनाही लाजवेल इतक्या त्या सुंदर दिसतात. सुप्रिया सध्या 'किस रंग प्यार के ऐसे भी' आणि 'जननी' या दोन हिंदी मालिकेत झळकत आहे. मालिकेतल्या त्यांच्या भूमिकेलाही रसिकांची विशेष पंसती मिळते. मराठी, हिंदी सिनेमांसह मालिका तसंच रियालिटी शोमध्ये आपली जादू दाखवली आहे.

सुप्रिया पिळगांवकरने आपल्या करिअरची सुरुवातच मोठ्या पडद्यावरच्या गुड गर्लच्या भूमिकेतून केली. त्याच रुपात ती रसिकांसमोर आली..डायरेक्टर प्रोड्यूसर बरोबरच प्रेक्षकांनाही सुप्रियात एक आदर्श स्त्रीच दिसली..आणि याच चांगुलपणाचा परिणाम तिच्या भूमिकेवरही पडला. त्याचमुळे की काय सुप्रियाला फक्त चांगल्या इमेज असलेल्याच भूमिका मिळाल्या.

 

मोठ्या पडद्यापासून ते छोट्या पडद्यावरच्या भूमिकादेखील सुप्रियाने चांगल्या पद्धतीने निभावल्या. इतकचं नाही तर सासू- सूनांच्या तू-तू मैं मैंवर असलेल्य़ा या मालिकेतूनही सुप्रियानं रसिकांना खळखळून हसवलं.

Web Title: Throwback Photo Of Supriya Pilgaonkar Caught Attention Of Everyone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.