यंदा राज्य मराठी पुरस्कारासाठी 'परतु'ला तीन नामांकने
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2016 09:53 IST2016-04-16T04:23:12+5:302016-04-16T09:53:12+5:30
यंदा असलेल्या ५३व्या राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांसाठी नितीन अडसूळ दिग्दर्शित 'परतु' या मराठी चित्रपटाला तीन नामांकने मिळाली आहेत. यामध्ये ...

यंदा राज्य मराठी पुरस्कारासाठी 'परतु'ला तीन नामांकने
य दा असलेल्या ५३व्या राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांसाठी नितीन अडसूळ दिग्दर्शित 'परतु' या मराठी चित्रपटाला तीन नामांकने मिळाली आहेत. यामध्ये उत्कृष्ट अभिनेत्री म्हणून स्मिता तांबे, उत्कृष्ट संगीतसाठी शशांक पोवार आणि प्रथम चित्रपट निर्मिती पदार्पण करणारे डेरेल कॉक्स, नितीन अडसूळ, कार्ल्क म्याकमिलियन, रुपेश महाजन या सर्वाची नामांकनासाठी निवड झाली आहे. सत्यकथेवर आधारित ही कहानी प्रेक्षकांच्या देखील पसंतीस देखील उतरली होती. रक्ताच्या नात्यापेक्षा सहवासाच्या, अनुभूतीच्या नात्याचे बंध अधिक बळकट असतात. अशाच जपलेल्या अनोख्या बंधाची व भावभावनांची हृदयस्पर्शी कथा म्हणजे परतु.ही कथा वास्तवात नगर जिल्ह्यात घडलेली ही सत्य घटना एका साध्या शेतकरी माणसाची आहे. एका घटनेने त्याचे आयुष्य कसे बदलते व राजस्थानच्या भूमीपर्यंत त्याचा प्रवास कसा होतो, हे सर्व या चित्रपटात अनुभवता येते. किशोर कदम, स्मिता तांबे, सौरभ गोखले, गायत्री सोहम, अंशुमन विचारे, नवनी परिहार, राजा बुंदेला, रवी भारतीय आणि बालकलाकार यश पांडे आदि कलाकारांच्या या चित्रपटात समावेश आहे.
![]()