बॉलिवूडच्या या अभिनेत्याची 'शिवरायांचा छावा'मध्ये एन्ट्री, मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत राहतोय लिव्ह इनमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2024 04:18 PM2024-02-12T16:18:38+5:302024-02-12T16:19:13+5:30

Shivrayancha Chhava : 'शिवरायांचा छावा' हा भव्य ऐतिहासिक पट रुपेरी पडद्यावर उलगडणार आहे. दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित हा चित्रपट १६ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

This Bollywood actor's entry in 'Shivarayancha Chhawa', he is living with the Marathmola actress in the live-in. | बॉलिवूडच्या या अभिनेत्याची 'शिवरायांचा छावा'मध्ये एन्ट्री, मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत राहतोय लिव्ह इनमध्ये

बॉलिवूडच्या या अभिनेत्याची 'शिवरायांचा छावा'मध्ये एन्ट्री, मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत राहतोय लिव्ह इनमध्ये

हिंदी सिनेइंडस्ट्रीतला अभिनता राहुल देव (Rahul Dev) लवकरच 'शिवरायांचा छावा' (Shivrayancha Chhava) चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात तो काकर खान ही निगेटिव्ह भूमिका साकारणार आहे. शिवरायांचा छावा हा भव्य ऐतिहासिक पट रुपेरी पडद्यावर उलगडणार आहे.  ए.ए. फिल्म्स आणि एव्हरेस्ट एंटरटटेंमेंट प्रस्तुत आणि दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित हा चित्रपट १६ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

औरंगजेबाने बुऱ्हाणपूरची पूर्ण जबाबदारी काकर खान या अनुभवी सरदारावर सोपविली होती. लोकांवर जिझिया कर लावत  काकर खानने  जनतेस  वेठीस  धरले होते.  काकरखानच्या  अन्यायी राजवटीपासून छत्रपती संभाजी  महाराजांनी  रयतेची  सुटका केली होती. याबद्दल राहुल देव म्हणाला की, ‘आजवरच्या अभिनय कारकिर्दीत अनेक खलनायकी भूमिका साकारल्या असल्या तरी क्रूरकर्मा काकर खान ही ऐतिहासिक भूमिका करण्यासाठी विशेष मेहनत घेतली आहे. एखादी विशेष भूमिका साकारताना अगदी भाषेपासून चालण्या बोलण्याच्या सवयीपर्यंतचे बदल करावे लागतात. 

काकरखान खानची भूमिका असल्याने उर्दू भाषा आत्मसात करणं मला गरजेचं होत. प्रत्येक भाषेचा स्वत:चा असा लहेजा असतो,  तो लहेजा लक्षात घेत ही भाषा मी शिकून घेतली. भाषेनंतर प्रश्न होता तो लुक्सचा. त्यामुळे देहबोलीही तितकीच बोलकी असण्याची महत्त्वाची जबाबदारी माझ्यावर होती. ती मी माझ्या अभिनयातून केली असल्याचे राहुल देवने सांगितले.

मल्हार पिक्चर्स कं.चे वैभव भोर, किशोर पाटकर, मधू यांनी या ऐतिहासिक चित्रपटाची निर्मिती केली आहे. तर सह-निर्मिती भावेश रजनीकांत पंचमतीया यांनी केली आहे. कार्यकारी निर्माता प्रखर मोदी आहेत. कथा दिग्पाल लांजेकरांनी लिहिली असून पटकथा-संवाद आणि गाणी देखील त्यांचीच आहेत. गाण्यांना साजेसं संगीत युवा संगीतकार देवदत्त मनीषा बाजी यांनी दिलं आहे. पार्श्वसंगीत अमर मोहिले यांचे आहे. चित्रपटाच्या वितरणाची जबाबदारी ए. ए.फिल्म्स सांभाळत आहे.

Web Title: This Bollywood actor's entry in 'Shivarayancha Chhawa', he is living with the Marathmola actress in the live-in.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.