सई ताम्हणकर पहिल्यांदाच करतेय 'ही' गोष्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2018 07:15 AM2018-11-21T07:15:00+5:302018-11-21T07:15:00+5:30

या वेबसीरिजमध्ये सईचा वेडसर फॅन तिचा पाठलाग करत असतो. जो सईच्या नकळत तिचे आपल्या मोबाइल कॅमे-यात चित्रीकरण करत असतो. ही थरारक वेबसीरिज पाहताना तुमच्या अंगावर काटा येईल.

This is the thing that Sai Tamhankar is doing for the first time | सई ताम्हणकर पहिल्यांदाच करतेय 'ही' गोष्ट

सई ताम्हणकर पहिल्यांदाच करतेय 'ही' गोष्ट

googlenewsNext
ठळक मुद्देएक थरार मालिका असणार आहे. ह्यामध्ये सई स्वत:च्याच म्हणजेच सई ताम्हणकरच्याच भूमिकेत असेलसईने दुनियादारी, बालक पालक, वजनदार यांसारख्या मराठी चित्रपटात तर हंटर, गजनी यांसारख्या हिंदी चित्रपटातही खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत.

सैफ अली खान, आर माधवन, भूमी पेडणेकर, नवाजुद्दीन सिद्दिकी अशा बॉलीवूड ए-लिस्टर सेलेब्सनी वेबसीरिजमध्ये काम केल्यावर आता मराठीतली सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्री सई ताम्हणकर लवकरच ‘डेट विथ सई’ या वेबसीरिजमध्ये दिसणार आहे.
 
डिसेंबरपासून सुरू होणा-या या वेबसीरिजविषयी सध्या खूप उत्कंठा आहे. ही एक थरार मालिका असणार आहे. ह्यामध्ये सई स्वत:च्याच म्हणजेच सई ताम्हणकरच्याच भूमिकेत असेल. सई ही पहिलीच भारतीय अभिनेत्री आहे, जी वेबसीरिजमध्ये स्वत:च्याच भूमिकेत दिसेल. 


या वेबसीरिजमध्ये सईचा वेडसर फॅन तिचा पाठलाग करत असतो. जो सईच्या नकळत तिचे आपल्या मोबाइल कॅमे-यात चित्रीकरण करत असतो. ही थरारक वेबसीरिज पाहताना तुमच्या अंगावर काटा येईल.

 सई ताम्हणकर म्हणली, “डेट विथ सई सारखी थरारशैलीचा चित्रपट वा मालिका मी कधीच केली नव्हती. त्यामुळे ही वेबसीरिज माझ्यासाठी एक वेगळा अनुभव आहे. एका फॅनचं तुमच्यावरच प्रेम कसं जीवघेणंही ठरू शकतं, त्याची अनुभूती देणारी ही वेबसीरिज आहे. वेबसीरिजच्या विश्वात डेट विथ सईने मी पाऊल ठेवत आहे. आणि डिसेंबरमध्ये येणा-या ह्या वेबसीरिजची मी खूप उत्सुकतेने वाट पाहत आहे.” 

सईने दुनियादारी, बालक पालक, वजनदार यांसारख्या मराठी चित्रपटात तर हंटर, गजनी यांसारख्या हिंदी चित्रपटातही खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. सईचे फॅन फॉलॉव्हिंग प्रचंड आहे.

Web Title: This is the thing that Sai Tamhankar is doing for the first time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.