ये रे ये रे पैसा ५ जानेवारीला होणार प्रदर्शित

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2017 15:23 IST2017-08-04T09:53:41+5:302017-08-04T15:23:41+5:30

दुनियादारी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटाने प्रेक्षक आणि समीक्षक दोघांची देखील चांगलीच वाहवा मिळवली होती. या चित्रपटाने ...

These ray ray money will be shown on January 5th | ये रे ये रे पैसा ५ जानेवारीला होणार प्रदर्शित

ये रे ये रे पैसा ५ जानेवारीला होणार प्रदर्शित

नियादारी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटाने प्रेक्षक आणि समीक्षक दोघांची देखील चांगलीच वाहवा मिळवली होती. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर देखील चांगलीच कमाई केली होती. या चित्रपटानंतर त्यांनी अनेक हिट चित्रपट दिले. पण गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या गुरू या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर तितके यश मिळवता आले नाही. या चित्रपटानंतर संजय जाधव प्रेक्षकांसाठी नवीन चित्रपट कधी घेऊन येतात याची सगळ्यांनाच उत्सुकता लागली होती. त्यांनी गेल्याच महिन्यात ये रे ये रे पैसा या चित्रपटाचे टीझर पोस्टर लाँच करून या चित्रपटाची घोषणा केली. संजय जाधव यांचा हा चित्रपट देखील चांगलाच असणार याची खात्री त्यांच्या फॅन्सना आहे.
गुरू आणि ये रे ये रे पैसा या दोन चित्रपटांच्या दरम्यान तब्बल दीड वर्षांचे अंतर आहे. त्यामुळे या काळात संजय जाधव काय करत आहेत. त्यांचा कोणता चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे याची उत्सुकता लोकांना लागलेली होती. पण आता त्यांचा चित्रपट पुढील वर्षी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
गुरू हा चित्रपट जानेवारी महिन्यात प्रदर्शित झाला होता. आता त्यानंतर त्यांचा ये रे ये रे पैसा हा चित्रपट देखील जानेवारी महिन्यातच प्रदर्शित करण्याचे त्यांनी ठरवले आहे. हा चित्रपट ५ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 
संजय जाधव यांच्या चित्रपटाची कथा काय असणार या चित्रपटात कोणते कलाकार असणार याबाबत संजय जाधवने मौन राखणेच पसंत केले आहे. या चित्रपटात प्रेक्षकांना नेहमीचेच चेहरे पाहायला मिळणार की काही नवी चेहरे या चित्रपटात झळकणार आहेत याची प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे. याचे उत्तर मिळवण्यासाठी काही दिवस तरी प्रेक्षकांना वाट पाहावी लागणार आहे. 

Also Read : टीम 'दुनियादारी'ची अशीही रियुनियन.. 'दुनियादारी'चा सिक्वेल येणार?

Web Title: These ray ray money will be shown on January 5th

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.