म्हणून मयूरी वाघ आणि पियूष रानडे दोघांसाठी यंदाचा गणेशोत्सव आहे स्पेशल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2017 17:55 IST2017-08-28T12:25:07+5:302017-08-28T17:55:07+5:30

बाप्पाच्या आगमनाने सगळीकडे उत्साह आणि आनंदाचे वातावरण पसरले आहे. लहानथोर सारेच लाडक्या गणरायाच्या भक्तीमध्ये तल्लीन झाले आहेत. आधी वंदू ...

Therefore, Mayuri Wagh and Piyush Ranade are the Ganeshotsav for the year this year | म्हणून मयूरी वाघ आणि पियूष रानडे दोघांसाठी यंदाचा गणेशोत्सव आहे स्पेशल

म्हणून मयूरी वाघ आणि पियूष रानडे दोघांसाठी यंदाचा गणेशोत्सव आहे स्पेशल

प्पाच्या आगमनाने सगळीकडे उत्साह आणि आनंदाचे वातावरण पसरले आहे. लहानथोर सारेच लाडक्या गणरायाच्या भक्तीमध्ये तल्लीन झाले आहेत. आधी वंदू तुज मोरया म्हणत सेलिब्रिटी मंडळीसुद्धा बाप्पाच्या चरणी लीन होतात.  वर्षभर शूटिंगमध्ये बिझी असणारे कलाकार गणेशोत्सव काळातील दिवस बाप्पासाठी राखून ठेवतात. या काळात सेलिब्रिटी मनोभावे बाप्पाच्या भक्तीत दंग होतात.सेलिब्रिटींसाठी बाप्पाचा हा उत्सव खास असतो. काहींसाठी तर गणेशोत्सव विशेष असतो.कुणाची मनातील इच्छा पूर्ण झाल्याने तर कुणाला मिळालेल्या यशामुळे गणरायाची पूजाअर्चा खास असते.मात्र काहींसाठी यंदाचा गणेशोत्सव विशेष आहे.त्यापैकी एक सेलिब्रिटी म्हणजे अस्मिता फेम अभिनेत्री मयूरी वाघ.मयूरीसाठी यंदाचा गणेशोत्सव थोडा स्पेशल आहे. कारण तिच्यासाठी हा गणेशोत्सव लग्नानंतरचा पहिलाच गणेशोत्सव आहे. गुन्हेगारांचा कर्दनकाळ म्हणून छोट्या पडद्यावरील अस्मिता या मालिकेतून रसिकांची लाडकी ठरलेली अभिनेत्री मयूरी वाघ काही महिन्यांपूर्वी रेशीमगाठीत अडकली. अस्मिता याच मालिकेतील तिचा जोडीदार तिच्या आयुष्याचा रियल जोडीदार बनला. या मालिकेत अस्मिताचा जोडीदार दाखवलेला अभि म्हणजेच अभिनेता पियूष रानडेसह मयूरी रेशीमगाठीत अडकली होती. लग्नानंतर मयूरीसाठी यंदाचा गणेशोत्सव पहिलाच आहे. त्यामुळे पहिल्यांदाच मयूरी आपल्या नव-यासह म्हणजेच पियूषसह गणेशोत्सव साजरा करते आहे. त्यामुळेच सासरी साजरा केलेल्या गणशोत्सवाच्या पहिल्या दिवसाचे फोटो तिने आपल्या फॅन्ससह सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या खास क्षणी मयूरीच्या चेह-यावरील आनंद ओसंडून वाहत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे तिचा हा आनंद हा असाच कायम राहावा आणि तिचा सुखी संसार बहरत राहो अशीच मागणी तिच्या फॅन्सनीही गणरायाकडे केली असावी.

Web Title: Therefore, Mayuri Wagh and Piyush Ranade are the Ganeshotsav for the year this year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.