'घरात वाघ बांधल्याचा फिल असतो...', सोहमने सांगितले सुचित्रा बांदेकरचे 'ते' किस्से

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2023 12:42 PM2023-07-22T12:42:38+5:302023-07-22T12:43:25+5:30

Soham Bandekar : 'बाईपण भारी देवा' चित्रपटात सुचित्रा बांदेकर यांच्यासोबत त्यांचा मुलगा सोहमनेदेखील काम केले आहे. त्याची या चित्रपटात छोटीशी भूमिका आहे.

'There is a feeling of having a tiger tied up in the house...', Soham told the story of Suchitra Bandekar. | 'घरात वाघ बांधल्याचा फिल असतो...', सोहमने सांगितले सुचित्रा बांदेकरचे 'ते' किस्से

'घरात वाघ बांधल्याचा फिल असतो...', सोहमने सांगितले सुचित्रा बांदेकरचे 'ते' किस्से

googlenewsNext

केदार शिंदे (Kedar Shinde) दिग्दर्शित बाईपण भारी देवा (Baipan Bhari Deva) या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली आहे. या चित्रपटात रोहिणी हट्टंगडी (Rohini Hattangadi), वंदना गुप्ते (Vandana Gupte), सुकन्या मोने (Sukanya Mone), सुचित्रा बांदेकर (Suchitra Bandekar), शिल्पा नवलकर (Shilpa Navalkar) आणि दीपा चौधरी (Deepa Chaudhari) या अभिनेत्री मुख्य भूमिकेत पाहायला मिळत आहेत. या चित्रपटाची ग्रॅण्ड सक्सेस पार्टी नुकतीच पार पडली. या चित्रपटातील कलाकारांनी गाण्यावर ठेका धरत पार्टीला चारचाँद लावले. तसेच कलाकारांनी अनुभवलेले अनेक धमाल किस्से यावेळी शेअर केले. 

बाईपण भारी देवा चित्रपटात सुचित्रा बांदेकर यांच्यासोबत त्यांचा मुलगा सोहमनेदेखील काम केले आहे. त्याची या चित्रपटात छोटीशी भूमिका आहे. छोटी भूमिका असली तरी त्याची भूमिका प्रेक्षकांच्या लक्षात राहिली आहे. सक्सेस पार्टीत जेव्हा सोहमला सुचित्रा घरी कशी वागते याबद्दल विचारण्यात आले, तेव्हा सोहमने त्यावर मजेशीर उत्तर दिले.
सोहम म्हणाला की, आईच्या आवाजाला फीडबॅक देणारा मीच एकटा होतो, त्यामुळे माझे या चित्रपटासाठी कास्टिंग झालेले आहे. कारण बोलताना खूप जण घाबरतात. माझ्या घरी माझे फ्रेंड आले की साधारण घरात वाघ बिघ बांधलेला असल्याचा फिल असतो. माझे फ्रेंड बाबांना हाय हॅलो करतात, काका कसे आहात? आणि काकू आहेत का घरात? असं हलक्या आवाजात विचारतात. 


तो पुढे म्हणाला की, माझ्या मित्रांनी आयुष्यात न खाल्लेल्या पालेभाज्या किंवा काहीही अगदी चवळीची उसळ माझ्या घरी खाल्लेली आहे. कारण आईला जर कळलं की भाजी नाही आवडली. तर मित्र लगेचच म्हणतात की, नाही नाही काकू सॉलिड झालीये भाजी. असे असल्यामुळे मी तुझ्या प्रश्नाला उत्तर नाही देऊ शकत. हे बोलल्यावर केदार शिंदे त्याला खुणावत म्हणाले की पाठीमागे आई उभी आहे तिकडे बघ. सोहम म्हणाला की, मी तिकडे बघणारच नाही माझे ठरलंय एवढे बोलून झाले की मी डायरेक्टर इथून निघून जाणार आहे. सोहम बांदेकरच्या या मजेशीर प्रतिक्रियेनंतर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

Web Title: 'There is a feeling of having a tiger tied up in the house...', Soham told the story of Suchitra Bandekar.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.