"थिएटर ऑफ रेलेवन्स नाट्यतत्व ...सौन्दर्यशास्त्र"

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2018 12:36 IST2018-03-23T07:06:15+5:302018-03-23T12:36:15+5:30

बाळ जन्माला येतं माणसाच्या जन्माची सुंदरता त्या निरागस स्वरूपात दिसते.. जगातले सर्वात सुंदर निर्मळ आणि मानवनिर्मित चैतन्य.. हेच चैतन्य ...

"Theater of Relevance Theater ... Beauty Studies" | "थिएटर ऑफ रेलेवन्स नाट्यतत्व ...सौन्दर्यशास्त्र"

"थिएटर ऑफ रेलेवन्स नाट्यतत्व ...सौन्दर्यशास्त्र"

ळ जन्माला येतं माणसाच्या जन्माची सुंदरता त्या निरागस स्वरूपात दिसते.. जगातले सर्वात सुंदर निर्मळ आणि मानवनिर्मित चैतन्य.. हेच चैतन्य सौंदर्य शोधण्याची , निर्मित करण्याची प्रवृत्ती , दृष्टी आपल्यात जन्मजात असते.. पण या सौंदर्यशास्त्राला विकसित नाही करत..अनहद नाद या नाटकाच्या निमित्ताने खरंतर हे निमित्त मात्र नाही तर अनेक निमित्तांचे निर्माण करणारे नाटक आहे .. या नाटकाच्या माध्यमातून सौंदर्यशास्त्र पाहण्याची दृष्टी मला या TOR च्या प्रक्रियेने जाणवून दिली... सौंदर्यशास्त्र हा शब्दही ऐकिवात नव्हता.. सौंदर्य म्हणजे सुंदरता दिसणे, भावणे... पण याच्याही पलीकडे असे सौंदर्य चे सुंदरतेच्या पलीकडे नेतं.. तुमच्या मनाला भिडतं , रोमारोमात फुलत जातं.. आणि तुमच्या मुखातून विलंब न होता शब्द स्फुटीत होतो वाह! सुंदर ! या नाटकाला सुरुवात केली त्यावेळी याची सुंदरता जाणवली नाही पण आज याचे एक एक formation पाहते आणि याची सुंदरता जाणवते...प्रत्येक formation मध्ये प्रत्येक माणसाला कलाकाराला उन्मुक्त होण्याची प्रक्रिया जाणवते... आजच्या युगात सौंदर्य वस्तूंमध्ये दर्शवले जाते.. वस्तूने बाह्य सौंदर्य सजवले जाते... पण अनहद नाद या नाटकाचे सौंदर्य मानवी प्रक्रिया आणि  कलाकाराच्या उन्मुक्ततेचे सौन्दर्य आहे ... हे सौन्दर्य फक्त दिसत नाही तर मनाला भिडत जाते ..आणि प्रेक्षक या प्रक्रियेचा एक भाग बनत जातो .. 

    आज विकासाच्या अंदाधुंद काळात वस्तुकरणाच्या बाजारात प्रत्येकाला वस्तू बनवणारी कुरुपता फोफावत चालली आहे.  जिथे पाहावे तिथे वस्तूंची देवाणघेवाण आणि बाजारीकरण आहे. यांत निसर्ग, बम्हांड, झाडे, पक्षी, पंचतत्वाने निर्मित झालेल्या निसर्गाची सर्वात सुंदर निर्मिती 'मनुष्य' हा देखील वस्तू बनत चालला आहे, पण 'अनहद नाद' या वस्तुकरणाला बाहेर टाकतो, विरोध करतो. निसर्गाच्या सौंदर्याला मानवी मूल्यांच्या आकारातून साकार करतो इथे मानवच निसर्ग बनतो आणि नाटकाला ही नैसर्गिक बनवतो... इथे मानवच विचार बनतो आणि विचारांचे सौंदर्य प्रत्येक संवादाला वैचारिक बनवते. माणसाचा माणूस असण्याचा, माणूस बनून राहण्याचा हा सुंदर प्रवास...कलेचा माणसाला सात्विक बनवण्याचा कलात्मक प्रवास ही याची विशेष सुंदरता आहे ...ही दृष्टी की माणसाला वस्तू नका समजू तो जीवित आहे ... खळाळता झरा आहे ... या नाटकाच्या फॉर्मेशन मध्ये निसर्ग जिवंत होतांना दिसतो.. शरीर गायब होतात.. आणि विचार स्पष्ट होतात... माणसाचे शब्द आणि माणसाचे कर्म एक होतांना दिसतात... कलाकाराची ताकद याही पलीकडे एका व्यक्तीची ताकद किती सुंदर असते हे जाणवते .. क्षणभरात नदीचा प्रवाह.. तर दुसऱ्या क्षणी बस , रेल्वे यांची गर्दी .. क्षणात उगवणारा सूर्य तर कधी ब्रम्हांडात फिरणारे ग्रह... हिमालयाचे गोठवणारे टोक तर कधी जळत्या चितेत जळणारी मी असे एकाहून एक सुंदर मानवी आकृत्या ,चित्र स्पष्ट करत जातात आणि या फ्रेम्स मागे असलेला वैचारिक प्रवाह, आत्मिक संवाद स्पष्ट होत जातात ... 

Web Title: "Theater of Relevance Theater ... Beauty Studies"

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.