'धोंडी चंप्या: एक प्रेम कथा' चित्रपट या दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2022 06:39 PM2022-12-13T18:39:21+5:302022-12-13T18:39:59+5:30

'धोंडी चंप्या' ही रेडा आणि म्हशीची अनोखी प्रेमकहाणी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

The film 'Dhondi Champya: Ek Prem Katha' will hit the screens on this day | 'धोंडी चंप्या: एक प्रेम कथा' चित्रपट या दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला

'धोंडी चंप्या: एक प्रेम कथा' चित्रपट या दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला

googlenewsNext

रिलायन्स एंटरटेनमेंट आणि सुनील जैन प्रस्तुत ज्ञानेश भालेकर दिग्दर्शित 'धोंडी चंप्या: एक प्रेम कथा’ १६ डिसेंबरला रिलीज होणार आहे. 'धोंडी चंप्या' ही रेडा आणि म्हशीची अनोखी प्रेमकहाणी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. कल्ट डिजिटल यांच्या सहकार्याने, फिफ्थ डायमेन्शन आणि कल्ट डिजिटल निर्मित या धमाल चित्रपटाच्या माध्यमातून एक आगळीवेगळी प्रेमकहाणी पाहायला मिळणार आहे. 

प्रभाकर भोगले यांच्या कथेद्वारा प्रेरित होऊन बनवलेल्या या चित्रपटाचे कथा, पटकथा, संवाद ज्ञानेश भालेकर आणि सागर केसरकर यांनी लिहिले असून यात भरत जाधव, वैभव मांगले हे विनोदाचे दोन बादशाह प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. यांच्यासोबत सायली पाटील आणि निखिल चव्हाण हे सुद्धा मुख्य भूमिकेत दिसतील. पोस्टरमध्ये धोंडी आणि चंप्या दिसत असून या दोघांमध्ये फुलणारी प्रेमकथा यात पाहायला मिळणार आहे. पोस्टरवरून हा एक धमाल विनोदी चित्रपट असल्याचे दिसत आहे. 

या चित्रपटाबद्दल दिग्दर्शक ज्ञानेश भालेकर म्हणतात, ''सर्व वयोगटांसाठी असलेला हा एक कौटुंबिक चित्रपट आहे. धोंडी आणि चंप्या यांचे प्रेम सफल होण्यासाठी त्यांचे मालक त्यांना मदत करणार की, त्यांच्या प्रेमकथेत आणखी काही ट्विस्ट येणार, हे चित्रपट प्रदर्शित झाल्यावरच कळेल.'' 

या चित्रपटातील गाण्यांना सौरभ दुर्गेश यांनी संगीत दिले असून गुरु ठाकूर, मंदार चोळकर, गणेश निगडे यांनी ही गाणी शब्दबद्ध केली आहेत. तर या गाण्यांना अवधूत गुप्ते, वैशाली सामंत, सनाह मोईडुट्टी, सौरभ शेट्ये यांचा आवाज लाभला आहे. सुनील जैन, आदित्य जोशी, व्हेनिसा रॉय, आदित्य शास्त्री निर्मित या चित्रपटाचे अमित अवस्थी, सुशांत वेंगुर्लेकर सहनिर्माते आहेत.

Web Title: The film 'Dhondi Champya: Ek Prem Katha' will hit the screens on this day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.