गुलाबाची कळी म्हणुन ओळख असलेली अभिनेत्री तेजस्वीनी पंडित आता कामात चांगलीच व्यस्त आहे. ...
तेजस्विनीला हॉलिडेची गरज नाही
r /> गुलाबाची कळी म्हणुन ओळख असलेली अभिनेत्री तेजस्वीनी पंडित आता कामात चांगलीच व्यस्त आहे. सध्या सणांचा माहोल सुरु असून प्रत्येकजणच हॉलिडे एॅन्जॉय करायला मस्त कुठेतरी फिरायला जात आहेत. पण तेजस्वीनी मात्र फक्त आणि फक्त कामच करीत आहे. असे आम्ही नाही तर तेजस्वीनी स्वत:च सांगत आहे. सीएनएक्सला दिलेल्या माहितीमध्ये तेजस्वीनी सांगते मी सध्या काही चित्रपटांच्या चित्रीकरणात खुपच व्यग्र आहे. त्यामुळे आता सुट्टींचा सिझन असला तरी मी कुठेच जाऊ शकत नाही. माझे काम महत्वाचे आहे. मी काम जरी करीत असले तरी मी खुपच आनंदी आहे. मला कामातून नेहमी आनंदच मिळतो. आणि खरतर मला आता हॉलिडेची गरजच नाहीये. काही दिवसातच माझ्या चित्रपटांची घोषणा केली जाणार आहे.