सोशलमिडीयावर तेजश्री प्रधान चर्चेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2016 17:54 IST2016-07-30T12:24:00+5:302016-07-30T17:54:00+5:30
सध्या सोशलमिडीयाची क्रेझ आहे. याच सोशलमिडीयामुळे बॉलिवूडमध्ये ब-याच गोष्टीची चर्चा होते आणि आता हीच मराठीत ही व्हायला लागली आहे. ...

सोशलमिडीयावर तेजश्री प्रधान चर्चेत
स ्या सोशलमिडीयाची क्रेझ आहे. याच सोशलमिडीयामुळे बॉलिवूडमध्ये ब-याच गोष्टीची चर्चा होते आणि आता हीच मराठीत ही व्हायला लागली आहे. या चर्चेच कारण म्हणजे प्रेक्षकांची लाडकी सून जान्हवी म्हणजेच तेजश्री प्रधान. शिल्पा नवलकर आणि तेजश्री प्रधान यांच्या दोघांमधील वाद सोशल मिडीयावर मांडण्यात आले होते. शिल्पा नवलकर यांनी तेजश्री प्रधानच्या वागणुकीविषयी फेसबुकवर आपलं मत व्यक्त केले आणि त्यामुळे तेजश्री चचेर्चा विषय बनली. साडेअकाराची वेळ घेऊन मी एका व्यक्तीला भेटायला आले आहे. वेळेच्या दहा मिनिटे आधीच मी इथे पोहोचले. माझ्या मागून अभिनेत्री तेजश्रीप्रधान आली आणि ती सरळ त्या व्यक्तीच्या केबीनमध्ये गेली. तिने रिसेप्शनिस्टकडून परवानगीही घेतली नाही किंवा तिच्या आधी कोणीतरी आले आहे, याची साधी दखलही घेतली नाही. वागण्या बोलण्याच्या या साध्या गोष्टी लोकांना कधी समजतील? अशी पोस्ट शिल्पा नवलकर फेसबुकवर केली होती. यामुळे ही पोस्ट दिवसभरात धुमाकूळ घालत होती. त्यामुळे तेजश्री प्रधाननेदेखील शांत न बसता यावर कमेंट केली की, मी माझ्या डाएटिशियनकडे गेले होते. अकराची वेळ घेतली होती. पण मला दहा- पंधरा मिनिटे उशीर होणार असल्याचे मी डॉक्टरला कळवले होते. मी तिथे पोहोचल्यावर मला शिल्पा भेटल्या. त्यांना मी हसून 'हाय' म्हटले आणि मी तिथे बसले. त्यानंतर एक पेशंट झाल्यावर डॉक्टरनेच मला बोलावलं. इतक्या साध्या घटनेचे अशा पद्धतीने केलेले वर्णन न पटणारे आहे -