n style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px;">अभिनेत्री तेजा देवकर आता डॉक्टर झाली आहे. सिनेसृष्टीत असलेल्या तेजाने बहुदा सिनेमात डाॅक्टरची भूमिका केली असावी असे कदाचित तुम्हाला वाटलेही असेल,मात्र सिनेमात ती डाॅक्टर बनली नसून ती तिच्या ख-या आयुष्यात तीच्या नावापुढे डाॅक्टर ही पदवी लावणार अाहे. नुकतेच ग्रेट इंडियन नॉव्हेल लिटरेचरमध्ये तेजाने पीएचडी पूर्ण केली आहे. दोन वर्ष सिनेमातून ब्रेक घेऊन तेजाने पूर्णतः पीएचडीच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित केले होते. सिनेसृष्टीपासून ब्रेक घेतल्याने तेजा परदेशात सेटल झाली अशा अफवाही मध्यंतरीच्या काळात पसरल्या होत्या. मात्र आता नावापुढे डॉक्टर लावता येणार असल्याने तेजाची अवस्था 'आज मैं उपर आसमाँ नीचे' अशीच काहीशी झाली आहे. तेजाने या सगळ्याचे श्रेय तिच्या आजोबांना दिले आहे. त्यांच्यामुळेच आधी एमए आणि पीएचडी पूर्ण केल्याचे तेजाने सांगितले आहे. मात्र डॉक्टरेट मिळाल्याने लगेचच क्षेत्र बदलणार नसल्याचेही तेजाने स्पष्ट केले आहे. काही वर्षानंतर तेजाला डान्स अकादमी सुरू करण्याची इच्छा आहे. आशा जोगळेकर यांच्याकडून घेतलेले क्लासिकल नृत्याचे धडे या अकादमीच्या माध्यमातून नव्या पीढीपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करणार असल्याचे तेजाने सांगितले आहे. तेजाने पायलट बनावे अशी तिच्या वडिलांची इच्छा होती. मात्र तेजाने अभिनय क्षेत्रात करियर केले. गेल्या 7-8 वर्षांपासून सिनेमा आणि मालिकांमध्ये तेजाने काम केले. मात्र डॉक्टरेट मिळाल्याने जे करायचे ठरवले ते करता येणार असल्याने तेजा आनंदात आहे. आगामी काळात तेजाचे दोन सिनेमा रसिकांच्या भेटीला येत आहेत. भरत जाधव, मोहन जोशी यांच्यासह 'सून असावी अशी' आणि संजय खापरे,भाऊ कदम अशी स्टार कास्ट असलेला 'भोभाटा' हा सिनेमासुद्धा रसिकांच्या भेटीला येत आहे.
![]()