‘टेक केअर गुड नाईट’ या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2018 12:03 PM2018-07-31T12:03:58+5:302018-07-31T12:09:25+5:30

‘टेक केअर गुड नाईट’ या चित्रपटात सायबर गुन्हेगाराविरोधात दिलेला लढा यात रेखाटला गेला आहे.

 The teaser of 'Take Care Good Night' is displayed | ‘टेक केअर गुड नाईट’ या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

‘टेक केअर गुड नाईट’ या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

googlenewsNext
ठळक मुद्देगिरीश जोशी यांचे दिग्दर्शनात पदार्पण सायबर गुन्ह्याविरोधातील लढा  ‘टेक केअर गुड नाईट’ चित्रपटात

एव्हरेस्ट एंटरटेन्मेंट आणि एस पी एंटरटेन्मेंट यांची प्रस्तुती असलेला मराठी चित्रपट ‘टेक केअर गुड नाईट’ या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला.  या चित्रपटातून गिरीश जोशी यांनी दिग्दर्शनात पदार्पण केले असून या चित्रपटाची निर्मिती हिमांशू पाटील आणि महेश मांजरेकर यांनी केली आहे. या सिनेमात सचिन खेडेकर, महेश मांजरेकर, इरावती हर्षे, आदिनाथ कोठारे आणि पर्ण पेठे हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

 ‘टेक केअर गुड नाईट’ या चित्रपटाची कथा ही एका शहरातल्या कुटुंबाची असून या कुटुंबाने आपले स्थैर्य आणि सन्मान यासाठी एका सायबर गुन्हेगाराविरोधात दिलेला लढा यात रेखाटला गेला आहे. हा लढा देताना या कुटुंबाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. यातील वडिलांना बदलत्या तंत्रज्ञानाचे धडे घेत तंत्रज्ञानाबद्दलचे त्यांचे अज्ञान दूर करून घ्यावे लागते. आपल्या समुपदेशन कौशल्यावर बसलेली धूळ पुसत त्याचा वापर यातील आईला या कामी करून घ्यावा लागतो. आपल्या आई वडीलांबरोबरचा संवादाचा तुटलेला धागा यातील मुलीला पुन्हा जोडावा लागतो. कथेमध्ये मग या सर्व गोष्टी पुढे येतातच पण त्याचबरोबर आजच्या तंत्रज्ञानाने व्यापलेल्या जीवनशैलीचे अनेक पैलूही उलगडत जातात.

 

लेखक गिरीश जोशी म्हणाले की, या संकल्पनेचा जन्म त्यांच्या एका नातेवाईकच्या बाबतीत जो प्रसंग त्यांच्या वयाच्या ५०व्या वर्षी  घडला. हे नातेवाईक काही काळासाठी परदेशात होते. परत आल्यावर त्यांच्या लक्षात येते की, त्यांचे काही लाख रुपये हे त्यांच्या क्रेडीट कार्डावरून ऑनलाइन काढले गेले आहेत. जरी हे माझ्या नातेवाईकच्या बाबतीत घडत असले तरी मी याबाबत मोठ्या प्रमाणावर लिहिले पाहिजे असे मनोमन ठरवले होते. जसजशा व्यक्तिरेखा आकार घेत गेल्या तसतसे ही सायबर क्राइमची समस्या किती गहन आहे, हे अधिकाधिक उलगडत गेले. ‘सर्वसाधारण संवादाचा अभाव आणि माणसामाणसांमधील तुटलेला संपर्क’ हे मध्यवर्ती सूत्र आकाराला आले. हाच धागा पुढे विकसित होत गेला आणि या प्रवासातील सर्जनशील भाग अधिकाधिक संमिश्र होत गेला. जसजसे मी लिहित गेलो तसतसा माझ्यातील दिग्दर्शक अधिकाधिक आकार घेऊ लागला. त्यातून मग गती येत गेली आणि चित्रपटाला लय मिळत गेली. जेव्हा मी चित्रपटाचा अंतिम ड्राफ्ट तयार केला, तेव्हा मी ठरवले की या चित्रपटाचे दिग्दर्शनही मीच करणार. ‘टेक केअर गुड नाईट’ मग माझ्या दिग्दर्शकीय पदार्पणाचा चित्रपट ठरला.
‘टेक केअर गुड नाईट’ ३१ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
 
 

Web Title:  The teaser of 'Take Care Good Night' is displayed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.