‘गणवेश’नंतर तन्मय करणार लघुपट
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2016 11:58 IST2016-09-20T06:28:31+5:302016-09-20T11:58:31+5:30
‘गणवेश’ चित्रपटातील आपल्या अभिनयातून रसिकांच्या मनावर छाप पाडणारा तन्मय मांडे हा लवकरच लघुपटात दिसणार आहे. तन्मय ‘सायकल’ नावाच्या लघुपटाच्या ...
.jpg)
‘गणवेश’नंतर तन्मय करणार लघुपट
style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px; line-height: normal;">‘गणवेश’ चित्रपटातील आपल्या अभिनयातून रसिकांच्या मनावर छाप पाडणारा तन्मय मांडे हा लवकरच लघुपटात दिसणार आहे. तन्मय ‘सायकल’ नावाच्या लघुपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या लघुपटाचे दिग्दर्शन आणि लेखन राजेंद्र सोनार यांनी केले आहे, तर चैतन्य देसाई हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. सुदृढ आरोग्यासाठी सायकल चालवणे किती महत्त्वाचे असते हे दाखवण्याचा प्रयत्न या लघुपटातून करण्यात आलाय. या लघुपटात तन्मयसोबत सिद्धेशर झाडबुके, शिवाकांत सुतार, निलेश कुलकर्णी, संदीप सोमण, आदित्य कामत आणि हर्ष कालोकर यांचा देखील समावेश आहे.