'टकाटक' फेम अभिनेत्री प्रणाली भालेराव लवकरच येतेय प्रेक्षकांच्या भेटीला
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2023 16:38 IST2023-02-25T16:37:34+5:302023-02-25T16:38:05+5:30
Pranali Bhalerao : 'टकाटक' चित्रपटातून अभिनेत्री प्रणाली भालेराव घराघरात पोहचली आहे.

'टकाटक' फेम अभिनेत्री प्रणाली भालेराव लवकरच येतेय प्रेक्षकांच्या भेटीला
प्रेम…प्यार…इश्क… भाषा कोणतीही असो, या भावनेत खूप ताकद असते. प्रेम ही जगातील सुंदर गोष्टींपैकी एक आहे. आजवर इतिहासात ज्यांनी जगावेगळं ठरत प्रेमाला आपलसं केलं, ते अजरामर झाले. मग ते लैला मजनू असो वा रोमिओ ज्युलिएट.. प्रेम ही जगातील एक सुंदर भाषा आहे, ज्याने ही भाषा त्यालाच ती उमगते आणि स्वर्गाहून सुंदर जगाचा शोध त्याला लागतो. खरं प्रेम व्यक्त करण्यासाठी कोणत्याही दिवसाची आवश्यकता नसते, तरीही अनेकजण आपल्या प्रेमभावना खास व्यक्तीसमोर व्यक्त करतात. अशातच भर घालत निर्माता ऋषिकेश पवार निर्मित 'प्रेमात पडलोय' हे गाणे रसिक प्रेक्षकांच्या मनावर राज्य करण्यास तयार झाले आहे. नुकताच या गाण्याचा मुहूर्त सोहळा संपन्न पार पडला.
प्रेम आणि प्रेमाने प्रेमावर वाटणारा विश्वास, मनातल्या भावना व्यक्त करणं अलीकडे किती सोप्पं झालंय ना... या वाक्यासाठी योग्य उदाहरण म्हणजे नव्या जोडीचं नवीन रोमँटिक गाणं 'प्रेमात पडलोय'.अभिनेता स्वप्निल पवार आणि अभिनेत्री प्रणाली भालेराव ही मराठी मनोरंजन विश्वातील नवी कलाकार जोडी या गाण्यातून रसिक प्रेक्षकांच्या मनावर राज्य करण्यास सज्ज होत आहे.
निर्माता ऋषिकेश पवार निर्मित 'प्रेमात पडलोय' हे गाणं असून या गाण्याचे दिग्दर्शन स्वप्निल पवार पेलवत आहे. स्वप्निल पवार अभिनेता आणि दिग्दर्शक अशी दुहेरी भूमिका साकारताना पाहायला मिळणार आहे. तर या गाण्याला गायक आकाश महाले याने त्याच्या सुमधुर स्वरात स्वरबद्ध केले आहे. तर संपूर्ण गाण्याचे चित्रीकरण आकाश गडेकर त्याच्या कॅमेऱ्यात कैद करणार आहे. प्रणाली भालेराव आणि स्वप्निल पवार अभिनित 'प्रेमात पडलोय' हे रोमँटिक सॉंगच्या रिलीजची प्रेक्षक वाट पाहत आहेत.