​स्वप्निल-लीनाची अशी जमली जोडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2016 13:19 IST2016-12-16T13:16:32+5:302016-12-16T13:19:58+5:30

 स्वप्निल जोशीचे नाव आज मराठी चित्रपसृष्टीत अजरामर झाले आहे. स्वप्निलने अनोख्या अभिनय शैलीने रसिक प्रेक्षकांच्या मनात स्वत:ची जागा निर्माण ...

Swapnil-Lena's concerted pair | ​स्वप्निल-लीनाची अशी जमली जोडी

​स्वप्निल-लीनाची अशी जमली जोडी

 स्वप्निल जोशीचे नाव आज मराठी चित्रपसृष्टीत अजरामर झाले आहे. स्वप्निलने अनोख्या अभिनय शैलीने रसिक प्रेक्षकांच्या मनात स्वत:ची जागा निर्माण केली आहे. स्वप्निल विषयी अनेकांना बºयाच गोष्टी माहित असतील. किंवा त्याच्या चाहत्यांना त्याच्याविषयी बरंच काही जाणून घ्यायची इच्छआ देखील असेल. तर आम्ही तुम्हाला आज स्वप्निलच्या लग्नाबददल काही गोष्टी सांगणार आहोत. कारण आज स्वप्निलच्या लग्नाचा वाढदिवस आहे. स्वप्निलआणि त्याची पत्नी लीना आराध्ये-जोशी यांच्या लग्नाचा आज पाचवा वाढदिवस आहे. स्वप्निल आणि लीना १६ डिसेंबर २०११ ला लग्नाच्या बेडीत अडकले. आणि स्वप्निल जोशी झाला औरंगाबादचा जावई. पण सिल्व्हर स्क्रिनवर लव्हस्टोरीज रंगवणा-या ह्या मराठी सिनेसृष्टीतल्या हिरोचं लग्न 'अरेंज मॅरेज' होतं. त्यांचे लग्न जमण्याची ते अगदी लग्न लागेपर्यंतची संपूर्ण स्टोरी ही एखाद्या चित्रपटाला साजेशी अशी आहे. स्वप्निल आणि लीनाच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हीच स्टोरी आम्ही आज तुम्हाला सांगणार आहोत. 


 कसे भेटले स्वप्निल - लीना : 
     स्वप्निल आणि लीना यांचे अरेंज मॅरेज आहे. त्यामुळे या दोघांनीही रितसर बघण्याचा कार्यक्रम केला. परंतू हा कार्यक्रम काही टिपिकल कांदे-पोह्याचा झआला नाही. तर या दोघांची पहिली भेट झाली कॉफी शॉपमध्ये. लीना स्वप्निलची वाट बघच कॉफी शॉपमध्ये बसली होती. त्या दिवशी स्वप्निल रात्री साडे अकरा पर्यंत शूटिंक करत होता. शूटिंग संपवून तो लेट नाईट लीनाला भेटायला कॉफी शॉपमध्ये आला. एक मुलगी आपली वाट बघत एवढ्या रात्री थांबते यावरुनच तो इम्प्रेस झाला होता. मग दोघेही मस्त गप्पा मारत होते. त्यांचे पहिल्याच दिवशी असे सुर जुळले की रात्री २ वाजेपर्यंत ते मनमोकळ््या गप्पा मारत होते. 



 स्वप्निलने लीनाला काय अट घातली :
       स्वप्निल आणि लीनाची पहिली भेट तर छानच झाली. दोघांनी एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न केला. पण यावेळी स्वप्निलने लीनाला सांगितले तु लग्नानंतर माझ्या आई-वडिलांसोबत रहावे अशी माझी इच्छा आहे. परंतू स्वप्निल काही बोलण्याच्या आधीच लीनाने या गोष्टीला होकार दिला होता. 


 लग्नाच्या आधीच लीनावर शोककळा पसरली :
     स्वप्निल-लीनाचे लग्न १६ डिसेंबर रोजी ठरले होते. लग्नाचे मंगलमय सुर दोन्ही घरात घुमु लागले होते. लगीनघाई सुरु होती. लग्न अवघ्या १५ दिवसांवर येऊन ठेपले असतानाच काळाने लीनाच्या आनंदावर विरझण घातले आणि लीनाच्या वडिलांचे यावेळी अचानक निधन झाले. स्वप्निल आणि त्याच्या घरच्यांनी यावेळी लीनाला बराच आधार दिला.


 
या पंचतारांकीत हॉटेलमध्ये झाले लग्न :
      लीना ही मुळची औरंगाबादची असल्याने लग्न हे औरंगाबादलाच होणार होते. औरंगाबादच्या पंचतारांकीत ताज हॉटेलमध्ये पारंपारिक रितीरिवाजात या दोघांचेही लग्न पार पडले. 


 लग्नाची पहिली रात्र कुठे राहिले स्वप्निल- लीना :
         लग्न झाल्यानंतर नवविवाहित जोडी ही नवºयाच्याच घरी जाते अशी आपली परंपरा आहे. परंतू यांच्या बाबतीत जरा वेगळेच झाले. पहिल्याच दिवशी हे दोघे लीनाच्या घरी गेले. लीनाच्या घरी या दोघांनीही पहिली रात्र काढली. यावेळी लीनाच्या मित्रमैत्रीनींनी दोघांनाही फार छळले. सर्वजण यांच्या खोलीत रात्री ३ वाजेपर्यंत गाण्यांच्या भेंडया खेळत होते. शेवटी दोघांनीही झोपण्याचे नाटक केल्यानंतर सर्वजण त्यांच्या खोलीतून बाहेर गेले.


 काय करते लीना :
         लीना ही डेंस्टींट आहे. खरतर स्वप्निलचे हे दुसरे लग्न आहे. त्याच्या पहिल्या बायकोचे नाव अपर्णा होते. पहिले लग्न लव्ह मॅरेज होते. परंतू चार वर्षाच्या संसारानंतर हे लग्न मोडले. स्वप्निलची पहिली बायको देखील डेंटीस्टच होती. 

Web Title: Swapnil-Lena's concerted pair

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.