स्वप्नील जोशी सांगतो, दिग्दर्शन करणे कठीण काम

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2017 16:41 IST2017-02-11T11:11:36+5:302017-02-11T16:41:36+5:30

बेनझीर जमादार      अभिनेता स्वप्नील जोशी याने विविध चित्रपटांद्वारे आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. दुनियादारी, तू ही रे, ...

Swapnil Joshi tells, it is difficult to direct | स्वप्नील जोशी सांगतो, दिग्दर्शन करणे कठीण काम

स्वप्नील जोशी सांगतो, दिग्दर्शन करणे कठीण काम

बेनझीर जमादार
    

अभिनेता स्वप्नील जोशी याने विविध चित्रपटांद्वारे आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. दुनियादारी, तू ही रे, मितवा असे अनेक सुपरहिट चित्रपट त्याने मराठी चित्रपटसृष्टीला दिले आहेत. नुकताच त्याचा फुगे हा चित्रपट प्रदर्शित झाला. याच चित्रपटाविषयी स्वप्नीलने लोकमत सीएनएक्सशी साधलेला संवाद.

१. या चित्रपटातील तुझ्या भूमिकेविषयी काय सांगशील?
- या चित्रपटात माझी आदित्य नावाची व्यक्तिरेखा आहे. तो भित्रा, बावळट, थोडासा घाबरट असतो. त्याचा एक जिवलग मित्र ऋषिकेश आहे. या मित्रावर तो जिवापेक्षाही जास्त प्रेम करणारा दाखविण्यात आला आहे. अशा आमच्या घनिष्ट मैत्रीवर आधारित फुगे हा चित्रपट आहे. या चित्रपटात ऋषिकेशची भूमिका अभिनेता सुबोध भावे साकारत आहे. त्यामुळे स्वप्नील आणि सुबोध यांची आॅनस्क्रीन केमिस्ट्री पहिल्यांदा या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

२. या चित्रपटासाठी तू पहिल्यांदा लिखाण केले आहे, त्यामुळे तुझ्यासाठी हा अनुभव कसा होता ?
- माझ्यासाठी अनुभव खूपच अप्रतिम होता. याची मूळसंकल्पना अशी होती की, मला आणि सुबोधला एकमेकांसोबत काम करण्याची तीव्र इच्छा होती. एकमेकांसोबत काम करायचे म्हटल्यावर लिहिणार कोण, कास्ट होणार कधी हा विचार करता, आम्हीच लिहिण्याचा निर्णय घेतला. आम्ही दोघेही काय हाडाचे लेखक नाहीत. मात्र आमच्यामधील अभिनेत्याने एकत्रित येण्याच्या या तीव्र इच्छेतून झालेली ही गोष्ट आहे. 

३. स्वप्नील जोशी म्हटले की, चित्रपट हिट हे समीकरण ठरले आहे, याविषयी काय सांगशील?
- मला असं वाटतं की, आपला अभिनय प्रेक्षकांपर्यत पोहोचण्यासाठी कठोर मेहनत करणे, त्याचबरोबर आपल्या भूमिकेला शंभर टक्के न्याय देण्याचा प्रयत्न करणे,  प्रेक्षकांची मनं जिंकणे हाच प्रत्येक कलाकाराचा प्रयत्न असतो. बाकी सर्व गोष्टी म्हणजे चित्रपट हिट होणं नाही होणं हे मायबाप रसिकांच्या प्रतिसादावर अवलंबून असतं. पण माझ्या रसिक मायबापाचे प्रेम, कौतुक, चांगला प्रतिसाद मला नेहमीच मिळत असतो हे माझं भाग्य आहे.

४. मराठी चित्रपटसृष्टीत सुबोध आणि तू दोघेही तगडे कलाकार आहात, त्यामुळे काम करण्याचा अनुभव कसा होता?
- सुबोधसोबत काम करताना खूप मजा आली. मला वाटतं हा तो आजच्या फळीतील अत्यंत गुणी अभिनेता आहे. आम्ही दोघेही एकमेकांच्या कामाची नेहमीच प्रशंसा करतो. त्यामुळे एकमेकांचे चाहते झालो आहोत.  या चित्रपटाच्यानिमित्ताने दोघे एकत्र आलो. या कामाच्या व्यापातून आमच्यातील अभिनेते बाजूला पडून आम्ही दोघे कधी एकमेकांचे चांगले मित्र झालो हेच कळाले नाही. त्यामुळे मला आयुष्यभरासाठी सुबोध हा मिळालेला एक चांगला मित्र आहे. 

५. अभिनेता, कथालेखकानंतर आता भविष्यात दिग्दर्शन करण्याचा विचार केला आहे का?
- मला असं वाटतं की, दिग्दर्शन ही खूप मोठी जबाबदारी आहे. दिग्दर्शन करण्यास संयम, दृष्टी अशा खूपसाºया गोष्टी लागतात. त्याला वेळदेखील खूप द्यावा लागतो. ज्यावेळी या सर्व गोष्टी मी करेन, त्यावेळीच दिग्दर्शन करण्यास मी तयार होईन. आता त्याची गरज नाही. हल्ली लोकांना असे वाटते की, दिग्दर्शन करणे खूप सोपी गोष्ट आहे, मात्र असे नाही. दिग्दर्शन करणे ही फार कठीण गोष्ट आहे. दिग्दर्शक इज कॅप्टन आॅफ शीप. 

Web Title: Swapnil Joshi tells, it is difficult to direct

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.