स्वानंदी बेर्डेनं शेअर केलं 'धनंजय माने इथंच राहतात'चं टायटल ट्रॅक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2021 16:55 IST2021-03-17T16:54:57+5:302021-03-17T16:55:30+5:30

स्वानंदी लवकरच वेगळ्या अंदाजात प्रेक्षकांच्या भेटीला येते आहे.

Swanandi Berde shared the title track of 'Dhananjay Mane Ithanch Rahatat' | स्वानंदी बेर्डेनं शेअर केलं 'धनंजय माने इथंच राहतात'चं टायटल ट्रॅक

स्वानंदी बेर्डेनं शेअर केलं 'धनंजय माने इथंच राहतात'चं टायटल ट्रॅक

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे आणि अभिनेत्री प्रिया बेर्डे यांची लेक स्वानंदी बेर्डे सोशल मीडियावर बरीच सक्रिय आहे. स्वानंदी लवकरच वेगळ्या अंदाजात प्रेक्षकांच्या भेटीला येते आहे. ती नाटकात पदार्पण करत असून ती 'धनंजय माने इथंच राहतात' या तिच्या पहिल्या नाटकाची घोषणा करण्यात आली आहे. या नाटकात स्वानंदी सौ. मानेंच्या भूमिकेत ती दिसणार आहे. नुकतेच तिने या नाटकाचे टायटल ट्रॅक सोशल मीडियावर शेअर केले आहे.

अभिनेत्री स्वानंदी बेर्डे हिने इंस्टाग्रामवर 'धनंजय माने इथंच राहतात' या नाटकाचे टायटल ट्रॅक शेअर करत लिहिले की,टायटल ट्रॅक. नक्की रिल्स बनवा आणि आम्हाला टॅग करायला विसरू नका.


काही दिवसांपूर्वी स्वानंदी बेर्डेने इंस्टाग्रामवर फोटो शेअर करत ही आनंदाची बातमी सांगितली होती. तिने फोटो शेअर करत लिहिले की, श्री आणि सौ. माने. माझ्या नवीन प्रोजेक्टबाबत तुमच्यासोबत शेअर करताना मी खूप उत्साही आहे. नवीन नाटक धनंजय माने इथेच राहतात.. लवकरच तुमच्या भेटीला घेऊन येतोय. वाट बघा. म्हणजे आमच्या येण्याची.


स्वानंदीचा भाऊ अभिनय बेर्डे मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता आहे. त्याने ती सध्या काय करते, रंपाट आणि अशी ही आशिकी या चित्रपटात काम केले. त्याने पदार्पण केल्यानंतर स्वानंदीच्या पदार्पणाची सगळेजण वाट पाहत होते. अखेर तीदेखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येते आहे. विशेष बाब म्हणजे, लक्ष्मीकांत बेर्डे यांनीदेखील नाट्य क्षेत्रातूनच सिनेकारकीर्दीला सुरूवात केली होती. त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत स्वानंदीदेखील नाटकात काम करताना दिसणार आहे.


खरेतर अशी ही बनवाबनवी चित्रपटातील धनंजय माने इथेच राहतात का हा लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ आणि सचिन पिळगावकर यांचा हा डायलॉग खूप प्रसिद्ध आहे. आता याच नावाचे नाटक येत्या १९ मार्चपासून नाट्यरसिकांच्या भेटीला येत आहे. राजेश देशपांडे यांनी या नाटकाचे दिग्दर्शन केले आहे. या नाटकात स्वानंदीसोबत तिची आई आणि अभिनेत्री प्रिया बेर्डे प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.

Web Title: Swanandi Berde shared the title track of 'Dhananjay Mane Ithanch Rahatat'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.