'ही' आहे मराठीतील स्टार किड, सिनेमात झळकण्याआधीच ठरते सुपरहिट
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2019 10:49 IST2019-10-15T10:48:44+5:302019-10-15T10:49:17+5:30
इन्स्टाग्राम अकाऊंटवर फोटोशूटचे आणि इतरही काही फोटो ती शेअर करत असते. नुकताच शेअऱ केलेल्या एक फोटो खूप व्हायरल होत आहे. या फोटोंमध्ये तिचा ग्लॅमरस लूक पाहावयास मिळतो आहे.

'ही' आहे मराठीतील स्टार किड, सिनेमात झळकण्याआधीच ठरते सुपरहिट
सोशल मीडिया प्रत्येक ठिकाणी बॉलिवूडमधील स्टार किड्सची जोरदार चर्चा ऐकायला मिळते. आपल्या पालकांपेक्षा हम भी कुछ कम नहीं असं दाखवून देणारे अनेक स्टार किड्स सध्या चर्चेत आहेत. आपल्या आई वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत त्यांची मुलं मुलीसुद्धा अभिनय क्षेत्रात एंट्री मारणं ही काही नवी बाब राहिली नाही. असेच काही मराठी चित्रपटसृष्टीतही पाहायला मिळते आहे. यात मराठीतील स्टार किडच्या यादीत लक्ष्मीकांत बेर्डे यांची मुलगी स्वानंदी बेर्डेचे नाव आघाडीवर आहे.
स्वानंदी सोशल मीडियावर बरीच सक्रिय आहे. इन्स्टाग्राम अकाऊंटवर फोटोशूटचे आणि इतरही काही फोटो ती शेअर करत असते. नुकताच शेअऱ केलेल्या एक फोटो खूप व्हायरल होत आहे. या फोटोंमध्ये तिचा ग्लॅमरस लूक पाहावयास मिळतो आहे. हा फोटो पाहून अनेक लाईक्स आणि कमेंटसचा वर्षाव तिच्या फोटोवर होत आहे. रूपेरी पडद्यावर झळकण्याआधीच स्वानंदीचे रसिक तिच्या सौंदर्यांच्या प्रेमात पडत असल्याचे पाहायला मिळत आहे. तिच्या एक से बढकर एक फोटोमुळे सोशल मीडियावर स्टार किडसमध्ये फक्त आणि फक्त स्वानंदीचा बोलबाला असल्याचे पाहायला मिळत आहे.
स्वानंदी बेर्डेने 'रिस्पेक्ट' या सिनेमातून मराठी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले आहे. किशोर बेळेकर यांनी हा सिनेमा दिग्दर्शित केला आहे. या सिनेमात सात महिलांची गोष्ट दाखवण्यात आली आहे. या सातपैकी एका स्त्रीची भूमिका स्वानंदी हिने या सिनेमात साकारली आहे.