अभिनेता भूषण पाटीलला त्याच्या वाढदिवसादिवशी मिळाले हे सरप्राईज

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2018 08:11 PM2018-11-20T20:11:18+5:302018-11-20T20:13:27+5:30

मल्याळम चित्रपट 'अंगमाली डायरीज'चा मराठी रिमेक येत असून त्यात भूषण पाटील मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

Surprisingly, the actor got his birthday on actor Bhushan Patil | अभिनेता भूषण पाटीलला त्याच्या वाढदिवसादिवशी मिळाले हे सरप्राईज

अभिनेता भूषण पाटीलला त्याच्या वाढदिवसादिवशी मिळाले हे सरप्राईज

googlenewsNext

गेल्या वर्षी प्रदर्शित 'अंगमाली डायरीज' हा मल्याळम चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाला साऊथमध्ये खूप चांगला प्रतिसाद मिळाला. या चित्रपटाने वीस कोटींहून अधिक गल्ला जमविला होता. आता या चित्रपटाचा मराठीत रिमेक येत असून या चित्रपटाचे नाव 'कोल्हापूर डायरीज' असे आहे. ‘कोल्हापूर डायरीज’ या मराठी रिमेकमधील अभिनेता भूषण नानासाहेब पाटीलच्या लूकची झलक सोशल मीडियावर नुकतीच पाहायला मिळाली आहे. अवधूत गुप्ते प्रस्तुत 'कोल्हापूर डायरीज' या चित्रपटाचे दिग्दर्शन जो राजन यांनी केले आहे.

मूळचा धुळेचा असणारा भूषण नानासाहेब पाटील याने १८ नोव्हेंबरला त्याचा वाढदिवस साजरा केला आणि त्याच्या वाढदिवसाच्यादिवशी भूषणला सोशल मीडियावर प्रदर्शित झालेला त्याच्या नव्या चित्रपटातील नवा लूक हे खास सरप्राईज मिळाले. हे सरप्राईज जसे भूषणसाठी खास होते तसेच ते प्रेक्षकांसाठी देखील खास ठरले आणि भूषणच्या नव्या लूकला प्रेक्षकांकडून मिळालेल्या प्रतिसादामुळे त्याचा वाढदिवस अजून स्पेशल बनला.
अंगमाली डायरीज चित्रपट क्राईम ड्रामावर आधारीत आहे. यात अंगमाली या ठिकाणी राहणाऱ्या विन्सेन्ट पेपे या युवकाची कथा रेखाटण्यात आली आहे. तो एका घटनेमुळे गुन्हेगारी जगात सामील होतो आणि मग, त्याला कोणकोणत्या गोष्टींचा सामना करावा लागतो, हे यात दाखवण्यात आले आहे. 
अंगमाली डायरीज या चित्रपटाचा मराठी रिमेक 'कोल्हापूर डायरीज' चित्रपटाची कथा ही कोल्हापूरमध्ये घडलेली दाखवण्यात आली असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या चित्रपटात भूषण प्रमुख भूमिकेत दिसणार असून आता त्याच्या लूकची चर्चा होणार आणि प्रेक्षकांची उत्सुकता देखवील वाढणार हे नक्की.

Web Title: Surprisingly, the actor got his birthday on actor Bhushan Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.