'सुपरकॉप' समीर वानखेडेंच्या घरात चोरी, पत्नी क्रांती रेडकरला 'या' व्यक्तीवर आहे संशय
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2023 16:53 IST2023-01-07T16:52:51+5:302023-01-07T16:53:21+5:30
Kranti Redkar : क्रांती रेडकरच्या घरी चोरी झाल्याचे नुकतेच उघडकीस आले आहे.

'सुपरकॉप' समीर वानखेडेंच्या घरात चोरी, पत्नी क्रांती रेडकरला 'या' व्यक्तीवर आहे संशय
मागील वर्षी आर्यन खान ड्रग्स प्रकरण चांगलेच गाजले होते. या प्रकरणावर काम करणारे आणि याचा तपास करणारे अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) आणि त्यांची पत्नी मराठी अभिनेत्री क्रांती रेडकर (Kranti Redkar) चांगलेच चर्चेत आले. त्यानंतर या प्रकरणाला वेगळंच वळण लागले आणि क्रांती रेडकरच्या पतीवर बरेच आरोप करण्यात आले. आता पुन्हा क्रांती रेडकर चर्चेत आली आहे. यावेळी कारण वेगळे आहे. तिच्या घरी चोरी झाल्याचे समोर आले आहे.
क्रांती रेडकरच्या घरी चोरी झाल्याचे नुकतेच उघडकीस आले आहे. घरात काम करणाऱ्या मोलकरणीने ही चोरी केली असल्याचा आरोप क्रांतीने केला आहे. घरातील मौल्यवान असे साडेचार लाख रुपये किमतीचे घड्याळे चोरीला गेल्याची तक्रार क्रांतीने नुकतीच गोरेगाव पोलीस ठाण्यात केली आहे. त्यांनतर गोरेगाव पोलिसांनी गुन्हा नोंद केला असून यासंदर्भात तपास करत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, क्रांती रेडकरच्या घरात काम करणाऱ्या महिलेची नेमणूक एका एजेन्सीद्वारे करण्यात आली होती, मात्र काही दिवस काम केल्यानंतर घरात कोणी नसताना ही चोरी झाली आहे. त्यानंतर सदर महिला फरार झाली आहे. आता गोरेगाव पोलीस त्या महिलेला नोकरीवर ठेवलेल्या एजेन्सीचा आणि महिलेचा तपास करत आहेत.
घड्याळाची चोरी ही खूप दिवसांपूर्वी झाली होती, मात्र ही बाब आता लक्षात आल्यानंतर ५ जानेवारीला तक्रार नोंदवली गेली आहे. मोलकरीण उत्तर प्रदेशला गेल्याने पोलिस तिला पकडण्यासाठी उत्तर प्रदेशकडे रवाना झाले आहेत.