सुदेश भोसले यांच्या लेकीनं मराठी अभिनेत्यासोबत बांधली लग्नगाठ, वरातीत नाचताना दिसले हे कलाकार
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2025 12:08 IST2025-11-11T12:07:58+5:302025-11-11T12:08:32+5:30
सुदेश भोसले यांच्या लेकीनं म्हणजेच श्रुती भोसलेनं एका अभिनेत्यासोबत लग्नगाठ बांधली आहे.

सुदेश भोसले यांच्या लेकीनं मराठी अभिनेत्यासोबत बांधली लग्नगाठ, वरातीत नाचताना दिसले हे कलाकार
सुप्रसिद्ध गायक सुदेश भोसले यांची मुलगी श्रुती भोसले नुकतीच मराठमोळ्या अभिनेत्यासोबत लग्नबेडीत अडकली आहे. हा अभिनेता म्हणजे प्रतीक देशमुख. त्यांच्या लग्नाचा व्हिडीओ सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. ऑक्टोबर महिन्यात श्रुती आणि प्रतीकचा साखरपुडा पार पडला होता. त्याचे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले होते.
श्रुती भोसले आणि प्रतीक देशमुख नुकतेच विवाहबंधनात अडकले आहेत. त्यांचा हा विवाहसोहळा पुण्यातील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये पार पडला. गेल्या तीन दिवसांपासून मेहंदी, हळद, संगीत सोहळा पार पडला. या सोहळ्यातील काही क्षण सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. या लग्नाला काही मराठी कलाकारांनीदेखील हजेरी लावली. प्रतीकच्या एंट्रीच्या वरातीत अभिनेत्री श्रुती मराठे, अभिनेता गौरव घाटणेकर आणि अभिनेत्री तेजश्री प्रधान डान्स करताना दिसले.
सुदेश भोसले यांचा होणारा जावई म्हणजेच प्रतीक देशमुख मराठी अभिनेता आहे. त्यानेृ 'शुभ लग्न सावधान' यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. तसेच तो लेखक, निर्माता आणि इंजिनिअर आहे.