अशी रंगली होती सुरांची मैफल...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2016 03:47 PM2016-12-11T15:47:16+5:302016-12-12T13:04:05+5:30

धनश्री गैसास यांच्या सुमधुर आवाजाने झालेली सवाईच्या चौथ्या दिवसाची सुरवात.. पं. उदय भवाळकर यांच्या धृपद गायनात तल्लीन झालेले प्रेक्षक ...

Such a colorful Surrey concert ... | अशी रंगली होती सुरांची मैफल...

अशी रंगली होती सुरांची मैफल...

googlenewsNext
श्री गैसास यांच्या सुमधुर आवाजाने झालेली सवाईच्या चौथ्या दिवसाची सुरवात.. पं. उदय भवाळकर यांच्या धृपद गायनात तल्लीन झालेले प्रेक्षक अन सतार आणि सरोद वादनातून रसिकांच्या हृदयाची तार छेडणारे गुप्ता बंधू.. डॉ. एल  व अंबी सुब्रमण्यम  या पिता पुत्र च्या जोडीने व्हायोलिनमधून निर्माण केलेल्या नादब्रम्हामध्ये रसिक लीन झाले अन रंगली सुरांची ही मनाला तृप्त करणारी मैफल.
अश्विनी भिडे - देशपांडे यांची शिष्या धनश्री गैसास यांनी भीमपलाश रागाने मैफलीला प्रारंभ झाला.  भव्य अशा स्वरमंचावर  प्रथमच गाताना त्यांचा आत्मविश्वास आवाजाच्या माध्यमातून श्रोत्यांच्या कानावर पडत होता. त्यांच्या सादरिकरणाच्या प्रारंभीच त्यांनी रसिकश्रोत्यांची मने जिंकली. घैसास यांनी यावेळी विलम्बित तीन ताल तरान्याने रे बिरहा ही बंदिश भीम पलाश रांगांतून उलगडत रसिकांना अद्भुत स्वरांची सफर घडविली. नंतर द्रुत लयामधून जा जा रे अपने मंदिर वा ही बंदिश खुलवून पेश केली. शेवटी धनाश्री यांनी नजरिया ना लागे नही कही और ह्या दादर्‍याने  घैसास यांनी आपल्या सादरीकरनाचा समारोप केला. जयपूर अत्रौली घराण्याची ही पारंगत शिष्या सवाई गंधर्व शिष्यवृत्तीची मानकरी आहेत. त्यांना पुष्कराज जोशी, (तबला ), सिध्देश विचोलकर ( हार्मोनियम ), आणि अनुजा भावे, वैशाली कुबेर ( तानपुरा ), यांनी साजेशी साथसंगत केली.
पहिल्या सत्रात श्रीनिवास जोशी यांचे सपुत्र विराज जोशी यांनी आपल्या गायकितून आपल्या आजोबांनी म्हणजेचे भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी पहिलाच प्रयत्न केला आणि तो प्रयत्न यशस्वी देखील झाला. श्रीनिवास जोशी यांनी पंडीत भीमसेन जोशी यांनी तालीम दिलेल्या यमन रागाचे सादरीकरण केले आणि संपूर्ण श्रोतेमंडळींना या पिता - पुत्रच्या जोडीने अंर्तमूख करून टाकले. त्यांनर पित ड्ढ पुत्र च्या जोडीने माझा भाव तुझे चरणी अंभग सादर करूण संपूर्ण वातावरण  भक्तिमय  रसात वाहूण निघाले. तसेच पुढे त्यांनी जाणकर श्रोत्यांच्या उपस्थित  गायलेले  माझे माहेर पंढरी या भजनाने तर अक्षरशः कळसच गाठला, अन् तेव्हा नकळत रसिकांची ब्रम्हानंदी टाळी लागली.  त्यांना पांडुरंग पवार (तबला ), अविनाश दिघे (हार्मोनियम ), नामदेव शिंदे, मुकुंद बादरायनी (तानपुरा ), फारुख लतीफ ( सारंगी ), गंभीर महाराज (पखवाज ), माऊली टाकलकर (टाळ ) यांनी साथसंगत केली.
लक्ष्य व आयुष गुप्ता यांनी  सतार व सरोद वादनाच्या जुगलबंदीने  रसिकांच्या हृदयाची जणू तारच छेडली. अन टाळ्यांच्या कडकडाटात रसिकांनी त्यांना मानवंदनाच दिली. या दोन्ही बंधूनी  एकाच विचाराने, एकाच शैलीने रागाची मांडणी करत रागाचा विस्तार केला. त्यामुळे श्रोते स्वरविश्वात तल्लीन झाले. त्यांनी  सुरूवातीला संथगतीने अलाप जोड झाला चे सादरीकरण केले त्यानंतर हळुवारपणे जोग हा राग खुलवून श्रोत्यांनवर मोहिनी घातली. त्यांनी मैफलीची सांगता  खमाज रागाने केली. मात्र हा राग प्रस्तुत करताना आयुष गुप्ता याच्या सरोद वाद्याची तारच तुटली मात्र त्याने प्रसांगवधान दाखवुन तुटलेली तार तोडली अन पुन्हा श्रोत्यांना  स्वरर्स्वगाची सफर घडवली. त्यांना रामेंद्रसिंग सोलंकी (तबला), पं. अखिलेश गुंदेजा (पखवाज), विनय चित्राव(तानपुरा) साथसंगत केली. 
डॉ. एल. सुब्रमण्यम आणि अंबी सुब्रमण्यम यांनी स्वतःला मिळालेला गुरूंना स्मरण करून व्हायोलिनमधून जणू सप्तसुरांचा इंद्रधनू साकारला. त्यांनी सादर केलेल्या वैविध्यातून सूरसुमनांची ओंजळ भरली. रागमाला व्हायोलिनच्या सुरांमधून बरसली. 

Web Title: Such a colorful Surrey concert ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.