सुबोध भावेला अजूनही वाटते 'या' गोष्टीची भीती, म्हणाला- "मला चार लोकांसमोर..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2025 14:57 IST2025-10-05T14:56:53+5:302025-10-05T14:57:09+5:30
इतकी वर्ष इंडस्ट्रीत काम केल्यानंतरही अजूनही सुबोधला चार लोकांसमोर जाण्याची भीती वाटते. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्याने याचा खुलासा केला आहे.

सुबोध भावेला अजूनही वाटते 'या' गोष्टीची भीती, म्हणाला- "मला चार लोकांसमोर..."
सुबोध भावे हा मराठी सिनेसृष्टीतील उत्कृष्ट नट. अनेक मालिका, सिनेमांमध्ये त्याने विविधांगी भूमिका साकारल्या. 'बालगंधर्व', 'आणि डॉ. काशिनाथ घाणेकर', 'लोकमान्य : एक युगपुरुष', 'संत तुकाराम' या बायोपिकमधील भूमिकाही त्याने लिलया पेलल्या. इतकी वर्ष इंडस्ट्रीत काम केल्यानंतरही अजूनही सुबोधला चार लोकांसमोर जाण्याची भीती वाटते. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्याने याचा खुलासा केला आहे.
सुबोधने नुकतीच व्हायफळ या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली होती. या मुलाखतीत तो म्हणाला, "नाटक आयुष्यात आल्यानंतर मी पूर्णपणे बदललो. पण, मला अजूनही चार लोकांसमोर जाताना भीती वाटते. मी कधीच तुम्हाला रेड कार्पेट किंवा इव्हेंटमध्ये दिसणार नाही. कारण, मला आवडत नाही. मला लाजिरवाणं वाटतं. मला कॅमेऱ्यासमोर उभं राहून काम करायला सांगा. ते मला भयंकर आवडतं. मला नाटकात काम करायला आवडतं. पण, अजूनही मला दडपण येतं. मला भीती वाटते. चार लोकांसमोर जायची भीती वाटते. कारण, आपल्याला काहीच येत नाही, याची लाज वाटते. आपल्याला काही येत नाही आणि आपण लोकांसमोर जायचं याचा कमीपणा वाटतो".
"मला असं वाटतं की मी असं काय केलंय की मान उंच करून अभिमानाने लोकांसमोर जायचं. मला खूप अनकम्फर्टेबल होतं. जेव्हा मी रेड कार्पेटरवर जातो. एन्ट्री झाली की लोक फुलं टाकतात. तुतारी वाजवतात. मला असं होतं की मला गाढा कुठेतरी... गुपचूप आलो आणि मागच्या खूर्चीत जाऊन बसलो. यात मी सगळ्यात कम्फर्टेबल असतो. कारण कुणाचं लक्ष नसतं. ही भीती शाळेपासून आहे. शाळेच्या स्नेहसंमेलनात मी भाग घ्यायचो. पण, सगळी मुलं असायची म्हणून मी जायचो", असंही सुबोध पुढे म्हणाला.