​सुबोध भावे आणि दीप्ती देवी प्रेक्षकांसमोर ठेवणार अट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2017 18:16 IST2017-05-02T10:01:58+5:302017-05-03T18:16:20+5:30

सुबोध भावेचा फुगे हा चित्रपट काहीच महिन्यांपूर्वी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटातील सुबोधच्या कामाचे चांगलेच कौतुक झाले होते. या ...

Subodh Bhave and Deepti Devi will put the condition in front of the audience | ​सुबोध भावे आणि दीप्ती देवी प्रेक्षकांसमोर ठेवणार अट

​सुबोध भावे आणि दीप्ती देवी प्रेक्षकांसमोर ठेवणार अट

बोध भावेचा फुगे हा चित्रपट काहीच महिन्यांपूर्वी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटातील सुबोधच्या कामाचे चांगलेच कौतुक झाले होते. या चित्रपटानंतर आता सुबोध कोणत्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीस येणार याची सगळ्यांना उत्सुकता लागली होती. सुबोध आता एका नव्या मराठी चित्रपटात झळकणार असून या चित्रपटात त्याची जोडी दीप्ती देवीसोबत झळकणार आहे. या चित्रपटाची घोषणा कित्येक महिन्यांपूर्वीच करण्यात आली होती. या चित्रपटाच्या चित्रीकरणाची सुरुवात एका प्रेमगीताने करण्यात आली होती. या चित्रपटाचे नाव TTMM असणार असल्याची चर्चा गेल्या कित्येक दिवसांपासून आहे. पण आता या चित्रपटाचे नाव कन्डिशन्स अप्लाय म्हणजेच अटी लागू असल्याचे सुबोधनेच त्याच्या चाहत्यांना सांगितले आहे. सुबोधने त्याच्या चाहत्यांसाठी या चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच केले आहे. या पहिल्या पोस्टरद्वारे या चित्रपटाचे नाव घोषित करण्यात आले आहे. या पोस्टरमध्ये दिप्ती देवी आणि सुबोध भावे दोघेही प्रेक्षकांना पाहायला मिळत आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन गिरिश मोहिते यांचे असून निर्मिती डॉ. संदेश म्हात्रे यांनी केली आहे. या चित्रपटाची कथा संजय पवार यांची असून या चित्रपटाला अविनाश-विश्वजीत यांच्या जोडीने संगीत दिले आहे. गिरीश मोहिते यांनी आपल्या आगामी चित्रपटातून प्रेमाची नवी परिभाषा, नवी संकल्पना, नात्यांची नवी परिमाणे, मानवी संबंधातील नवीन प्रवाह या गोष्टींचा वेध घेतला आहे.
या चित्रपटात रसिकांना दमदार कथानकासोबतच अभिनेता सुबोध भावे व अभिनेत्री दीप्ती देवी यांची फ्रेश जोडी पाहायला मिळणार आहे. या दोघांसोबत या चित्रपटात अतुल परचुरेही मुख्य भूमिकेत आहेत. चित्रपटाची सहनिर्मिती सचिन भोसले करणार आहेत. 

Web Title: Subodh Bhave and Deepti Devi will put the condition in front of the audience

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.