स्पृहा जोशीचं शाहरुख खानशी असंही कनेक्शन, म्हणाली, "वाढदिवशी त्याचा फोन..."

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2023 01:07 PM2023-10-13T13:07:46+5:302023-10-13T13:08:25+5:30

शाहरुखला भेटण्याचा कधी योग आला का? यावर स्पृहा म्हणाली,...

spruha joshi celebrating birthday today says she is big fan of shahrukh khan wished he calls her on | स्पृहा जोशीचं शाहरुख खानशी असंही कनेक्शन, म्हणाली, "वाढदिवशी त्याचा फोन..."

स्पृहा जोशीचं शाहरुख खानशी असंही कनेक्शन, म्हणाली, "वाढदिवशी त्याचा फोन..."

अभिनेत्री, कवयित्री, सूत्रसंचालिका अशी बहुगुणी स्पृहा जोशी (Spruha Joshi) आज 34 वा वाढदिवस साजरा करत आहे. स्पृहाला तिच्या वाढदिवशी काय काय करायला आवडतं, वाढदिवसाला कोणाचा फोन यावा अशी स्पृहाची इच्छा आहे याबाबत तिने 'लोकमत फिल्मी'शी संवाद साधला. यावेळी स्पृहाचं आणि शाहरुख खानचं एक कनेक्शन समोर आलं.

अभिनेत्री स्पृहा शाहरुख खानची प्रचंड मोठी चाहती आहे. वाढदिवसाला तिला कोणी फोन करावा असं तिला विचारलं असता तिने अमिताभ बच्चन, रेखा, शाहरुख खान आणि झाकीर खान यांची नावं घेतली. 'लोकमत फिल्मी'शी संवाद साधताना स्पृहा म्हणाली,' या लोकांनी मला जर वाढदिवसाला फोन केला तर तो वाढदिवस म्हणजे क्या बात है असा होऊन जाईल. शाहरुख खानचा फोन आला तर मी तर रडेनच. खरंच मला उद्या शाहरुखचा फोन आला तर आधी मला विश्वासच बसणार नाही. कोणी तरी गंमत करतंय असंच मला वाटेल.'

शाहरुखला भेटण्याचा कधी योग आला का? यावर स्पृहा म्हणाली, 'योग गेलाय खरं तर. शाहरुखसोबत मला एक जाहिरात मिळाली होती. बऱ्यापैकी गोष्टी पुढे गेल्या होत्या. पण शूटच्या ज्या तारखा होत्या त्या पुढे ढकलल्या गेल्या. नेमक्या नवीन तारखांमध्ये मला जमणार नव्हतं. नंतर ती जाहिरात झाली आणि मला करता आली नाही याचं मला खूप वाईट वाटलं. अगदी हेच माझं अमिताभ बच्चन यांच्यासोबतही असंच झालं. तारखांमुळे त्यांच्यासोबतही काम करण्याची संधी हुकली.'

स्पृहाला वाढदिवसाला काम करायला, शहराच्या बाहेर फिरायला जायला  किंवा आवडतं काम करायचं असतं असंही ती म्हणाली. स्पृहा उत्तम कवयित्री आहे. तिचा सध्या संकर्षण व्हाया स्पृहा हा कवितांचा कार्यक्रम लोकप्रिय झाला आहे. संकर्षण कऱ्हाडेसोबत ती हा कार्यक्रम सादर करते.

 

Web Title: spruha joshi celebrating birthday today says she is big fan of shahrukh khan wished he calls her on

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.