झाला बोभाटाचा खास शो मुंबईतील डबेवाल्यांसाठी आयोजित करण्यात आला होता

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2017 16:38 IST2017-01-21T11:08:08+5:302017-01-21T16:38:08+5:30

अनुप जगदाळे दिग्दर्शित झाला बोभाटा चित्रपट काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाने आता करोडोंचा गल्ला पार केला आहे. ...

A special show of Haveli Bobhota was organized for the Dabwali in Mumbai | झाला बोभाटाचा खास शो मुंबईतील डबेवाल्यांसाठी आयोजित करण्यात आला होता

झाला बोभाटाचा खास शो मुंबईतील डबेवाल्यांसाठी आयोजित करण्यात आला होता

ुप जगदाळे दिग्दर्शित झाला बोभाटा चित्रपट काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाने आता करोडोंचा गल्ला पार केला आहे. आता हेच पाहा ना,  संपूर्ण जगात मुंबईतील डबेवाले हा कुतूहलाचा विषय आहे. डबेवाल्यांची आणि त्यांच्या कामांची महती इतकी आहे की, परदेशातून त्यांना भेटण्यासाठी मोठमोठी माणसं येतात. तसेच दिवस रात्र हे कष्ट करणारे डबेवाल्यांची महती बॉलिवुड आणि मराठी चित्रपटातदेखील दाखविण्यात आली आहेत. म्हणून अशा खास लोकांसाठी या चित्रपटाचे निर्माते साईनाथ राजाध्यक्ष यांनी झाला बोभाटा या चित्रपटाचा खास शो आयोजित केला होता. झाला बोभाटा हा चित्रपट अजून ही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे. हा चित्रपट एका गावावर चित्रीत करण्यात आला आहे. आता गाव आलं की बारा भानगडी आल्या आणि त्यात ती मान्याची वाडी तर अग्रेसरच म्हणा. मान्याची वाडी फक्त आदर्श गाव पुरस्कार असला की नटते-सजते, सोहळा संपला की मात्र जैसे थे. भ्रष्टाचार, स्वच्छता, पाणीटंचाई, दारूबंदी अशा अनेक प्रश्नांना कंटाळून गेलेले हे गावकरी. या सर्व प्रश्नांची उत्तर शोधण्यासाठी गावकरी पुन्हा एकत्र येतात, नेमकी काय भानगड आहे हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना हा चित्रपटा पाहावा लागेल. या चित्रपटात दिलीप प्रभावळकर, संजय खापरे, कमलेश सावंत, भाऊ कदम आदि कलाकारांचा समावेश आहे. तसेच या चित्रपटात मोनालिसा बागल आणि मयूरेश पेम मुख्य भूमिकेत पाहायला मिळत आहे. या दोन्ही नवोदित कलाकारांचा या चित्रपटातील अभिनय खरचं प्रेक्षकांचे मनं जिंकत आहे. या दोघांवरील चित्रित करण्यात आलेले पैंजण या गाण्याने सोशलमीडियावर धुमाकूळ घातला आहे. तसेच दिलीप प्रभावळकरदेखील या चित्रपटात हटक्या भूमिकेत पाहायला मिळत आहेत. 

Web Title: A special show of Haveli Bobhota was organized for the Dabwali in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.