बाप्पासाठी प्रिया बापटने बनवले खास 'मोदक'

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2017 17:43 IST2017-08-28T12:13:48+5:302017-08-28T17:43:48+5:30

घरोघरी बाप्पाचं वाजतगाजत आगमन झालं आहे. सर्वत्र उत्साह आणि चैतन्याचे वातावरण पसरलं आहे. प्रत्येकजण आपापल्या परीने लाडक्या गणरायाची आराधना ...

Special 'Modak' made by Priya Bapat for Bappa | बाप्पासाठी प्रिया बापटने बनवले खास 'मोदक'

बाप्पासाठी प्रिया बापटने बनवले खास 'मोदक'

ोघरी बाप्पाचं वाजतगाजत आगमन झालं आहे. सर्वत्र उत्साह आणि चैतन्याचे वातावरण पसरलं आहे. प्रत्येकजण आपापल्या परीने लाडक्या गणरायाची आराधना करण्यात दंग झाला आहे. आसमंतात बाप्पा मोरयाचा नाद घुमू लागला आहे. बाप्पाच्या चरणी लहानथोर सारेच नमस्तक झाले आहेत. सर्वसामान्यांसह सेलिब्रिटी मंडळीसुद्धा गणरायाच्या भक्तीत लीन झाले आहेत. गणपती बाप्पाची आराधना करण्याची प्रत्येकाच्या आपापल्या त-हा आहेत. जो तो ज्याला जमेन तसं बाप्पाची मनोभावे आराधना करतो. सेलिब्रिटीसुद्धा आपलं नेहमीचं बिझी शेड्युल बाजूला ठेवून बाप्पाच्या सेवेत स्वतःला वाहून घेतो. कुणी बाप्पाच्या पूजा आणि आरतीत दंग झाले आहेत. तर कुणी सेलिब्रिटी अनोख्या पद्धतीने बाप्पाला गा-हाणं घालत आहे. या सगळ्या सेलिब्रिटींमध्ये अभिनेत्री प्रिया बापट हिने काहीशा अनोख्या पद्धतीने बाप्पाचं स्वागत केलं आहे. बाप्पाचं सगळ्यात आवडतं खाद्य म्हणजे मोदक. त्यामुळेच बाप्पाच्या स्वागतासाठी प्रियाने खास मोदकाचा बेत केला. त्यासाठी प्रियाने विशेष तयारीसुद्धा केली होती. मोदक बनवून बाप्पाचं स्वागत करण्यासाठी प्रियाचा उत्साह शिगेला पोहचला होता. त्यानुसार प्रिया मोदक बनवण्याच्या कामात गुंतली होती. अखेर प्रियाची सगळी मेहनत फळाला आली अन् बाप्पासाठी प्रियाच्या हातून मोदक साकार झाले. हे मोदक पाहून प्रिया आपल्या चेह-यावरील आनंद लपवू शकली नाही. प्रसाद म्हणून साकारलेल्या मोदकातही प्रियाला जणू साक्षात गणरायच दिसले. त्यामुळे या मोदकासह फोटो काढून तिने आपल्या फॅन्ससह शेअर केला. त्याला तिने आकर्षक असं कॅप्शनही दिलं. हे मोदक बनवून वेगळाच आनंद आणि समाधान मिळाल्याचं तिने म्हटले आहे. यासाठीच सगळा अट्टाहास केल्याचंही तिने नमूद केले आहे.

Web Title: Special 'Modak' made by Priya Bapat for Bappa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.