गिरीष ओक म्हणतायेत, मराठी रंगभूमी जागतिक पातळीवर अग्रेसर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2016 12:57 IST2016-12-23T16:04:26+5:302016-12-26T12:57:32+5:30

बेनझीर जमादार    काही दिवसांपूर्वीच आनंद म्हसवेकर दिग्दर्शित यू टर्न या नाटकाने सहाशे प्रयोग पूर्ण केले आहेत. विशेष म्हणजे ...

Speaking of Girish Oak, the Marathi theater progressed globally | गिरीष ओक म्हणतायेत, मराठी रंगभूमी जागतिक पातळीवर अग्रेसर

गिरीष ओक म्हणतायेत, मराठी रंगभूमी जागतिक पातळीवर अग्रेसर

बेनझीर जमादार

  
काही दिवसांपूर्वीच आनंद म्हसवेकर दिग्दर्शित यू टर्न या नाटकाने सहाशे प्रयोग पूर्ण केले आहेत. विशेष म्हणजे या नाटकात अभिनेता गिरीष ओक आणि इला भाटे दोनच कलाकार आहेत. तरी या नाटकाने प्रचंड यश मिळविले आहे. या नाटकाच्या यशाविषयीच अभिनेता गिरीश ओक यांनी लोकमत सीएनएक्सशी साधलेला मनमोकळा संवाद
                  
१. या नाटकाचे सहाशे प्रयोग पूर्ण झाले याविषयी काय सांगाल?
- या नाटकाचे खरं तर हे यश पाहून खूपच आनंद झाला आहे. सुरूवातीला एक वेगळया प्रकारचे नाटक करण्याचा हा प्रयत्न आमचा खूप धाडसी होता. या नाटकातून गंभीर विषय आम्ही विनोदी शैलीतून मांडण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच नाट्यपरिषदेचे ज्यावेळी पहिले संमेलन झाले त्यावेळी हे नाटक दाखविण्यात आले होते. या नाटकाला अगदी पहिल्यापासूनच खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. या नाटकाच्या प्रयोगाने सहाशेचा आकडा पार करणे ही गोष्ट आमच्यासाठी अभिमानास्पद आहे. 

२. या नाटकाने आठ वर्षात २७ पुरस्कार प्राप्त केले आहे याविषयी काय वाटते?
-  आमच्या नाटकाला महाराष्ट्र शासनाचा पहिला पुरस्कार मिळाला. त्यामुळे ही गोष्ट आमच्यासाठी खूप मोठी आहे. तसेच २००८ सालचे सर्वच पुरस्कार आमच्याच नाटकाला मिळाले होते. हे नाटक रंगमंचावर आले आणि प्रेक्षकांनी या नाटकामुळे नाट्यगृहाकडे यू टर्न घेतला. तसेच हे जे पुरस्कार मिळाले आहेत ती आमच्या नाटकाची यशाची मोठी पावती आहे.
 
३. महाराष्ट्रातील नाट्यगृहाच्या परिस्थितीविषयी काय सांगाल?
- महाराष्ट्रातील नाट्यगृह हे चांगले आहेत मात्र ते मेटेंन व्यवस्थितरित्या होत नसल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील नाट्यगृहांची परिस्थिती खूपच वाईट आहे. या नाट्यगृहांच्या वाईट परिस्थितीविषयी  कलाकारांनी सातत्याने आवाज उठवूनदेखील काहीच  सोय होत नसल्याचे दिसत आहे. या तुलनेत गोवा या शहरात खूपच चांगली नाट्यगृह आहेत. ज्या गोष्टी परिपूर्ण व्हायला पाहिजे त्या होतच नाहीत. तसेच कलाकार आणि प्रेक्षकांसाठी सर्व सोईसुविधा केल्या पाहिजेत. ही नाट्यगृह आपल्याच पैशांनी उभारले असतात. त्याचप्रमाणे या नाट्यगृहाच्या निरीक्षणावर रंगभूमीचा माणूस असला पाहिजे.

४. पूर्वीची आणि आताची चित्रपटसृष्टीत काय फरक तुम्हाला जाणवितो?
- सध्या नाटकाचे दौरे खूपच कमी झाली आहे. तसेच ज्या तुलनेत इतर गोष्टींच्या किंमती वाढल्या आहेत त्या तुलनेत नाटकाच्या तिकीटाचे दर वाढले नाही. ही गोष्ट खूप त्रासदायक आहे.  त्याचप्रमाणे  नाट्यगृहात चांगल्या सोईसुविधा दिल्या तरच प्रेक्षकदेखील जास्त दराचे तिकीट खरेदी करून नाटक  पाहतील. निदान प्रेक्षकांच्या बेसिक गरजा तरी पूर्ण केल्या पाहिजे असे मला वाटते. मल्टीफ्लेक्स चांगले असतात म्हणून तर प्रेक्षक जास्त दराचे तिकीट खरेदी करून तेथे जातात. या नाट्यगृहाच्या सोईसुविधेसाठी कोणाकडे दाद मागावी काही कळत नाही.

५. मराठी रंगभूमीविषयी काय सांगाल?
- महाराष्ट्रात नाट्यगृहांची इतकी दुरवस्था असताना ही मराठी रंगभूमी ही जागतिक पातळीवर सर्वात अग्रेसर आहे. कारण या रंगभूमीवर वेगवेगळया नाटकाचे विषय, प्रकार पाहायला मिळतात. त्याचबरोबर आपल्याकडे दिवसाला नाटकाचे दोन किवा तीन शो होतात, इतर ठिकाणी रंगभूमी ही फक्त वीकेंड शो सारखीच असते.

६. आजच्या तरूणाईला करिअर म्हणून या क्षेत्राविषयी काय सांगाल?
- खरं सांगू का, या क्षेत्राला वाव खूप आहे. प्रसार माध्यमांचा वावर वाढतो आहे.  नाटक, मालिका आणि चित्रपट मोठया प्रमाणात येऊ लागले आहेत. दहावी आणि बारावीनंतर तरूणांईने योग्य विचार करून या क्षेत्रात पाऊले टाकावीत. कारण चंदेरी दुनिया म्हणून या क्षेत्राचा विचार करू नये. तसेच या क्षेत्राला शास्त्रशुद्ध आणि तंत्रशुद्ध शिक्षण घेतलेल्या लोकांची गरज आहे. कारण हुशार दिग्दर्शक, लेखक, नेपथ्यकार यामुळे सध्या प्रायोगिक आणि व्यावसायिक नाटकांची सीमा रेषा पुसूट होऊन एक स्थित्यंतर निर्माण झाले आहे. 

Web Title: Speaking of Girish Oak, the Marathi theater progressed globally

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.