अॅक्शनपट 'राडा' चित्रपटाला साउथ स्टाईल टच, अभिनेता आकाश शेट्टी तुप्तेवारचं पदार्पण
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2022 16:22 IST2022-09-30T16:21:36+5:302022-09-30T16:22:23+5:30
Raada Movie: राम शेट्टी निर्मित 'राडा' चित्रपट नुकताच भेटीला आला आहे.

अॅक्शनपट 'राडा' चित्रपटाला साउथ स्टाईल टच, अभिनेता आकाश शेट्टी तुप्तेवारचं पदार्पण
साउथ स्टाईल कमालीची अॅक्शन आणि तरुणाईला भुरळ पाडणारा हँडसम हंक 'राडा' (Raada Movie) या चित्रपटातून नुकताच भेटीला आला. फुल्ल ऑफ अॅक्शन, कॉमेडी आणि सोबत रोमँटिक सीन्सचा भरणा असलेल्या 'राडा' चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला. या चित्रपटाचा हिरो 'समा' म्हणजेच अभिनेता आकाश शेट्टी तुप्तेवारने 'राडा' या सिनेमातून सिनेविश्वात पदार्पण केले आहे. साउथ लूकचा टच घेत आकाश पहिल्यांदाच अॅक्शनपटातून मोठ्या पडद्यावर झळकणार आहे
राम शेट्टी निर्मित 'राडा' सिनेमाचे पोस्टर खूप चर्चेत आले होते. या पोस्टरमध्ये एकदम रफ अँड टफ असून रुबाबदार आणि डॅशिंग शरीरयष्टी असलेला एक हँडसम हंक पाहायला मिळाला होता. रमेश व्ही. पारसेवार आणि सुप्रिम गोल्ड प्रस्तुत, सूरज फिल्म अँड एंटरटेनमेंट बॅनरचा आणि सहनिर्माता वैशाली पेद्दावार व पॅड कॉर्प - पडगीलवार कॉर्पोरेशन यांचा हा भव्यदिव्य अॅक्शनपट नुकताच भेटीला आला आहे.
दिग्दर्शक रितेश सोपान नरवाडे यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन, संवाद आणि स्क्रीनप्ले अशा तीनही धुरा पेलवल्या आहेत. तर चित्रपटाच्या संगीताची जबाबदारी दिनेश अर्जुना आणि एका गाण्याची धुरा मयुरेश केळकर यांनी सांभाळली असून गाण्याचे बोल जाफर सागर लिखित असून त्यापैकी एक गाणे विष्णू थोरे यांनी लिहिले आहे. तर हा भव्य अॅक्शनपट के. प्रवीणने त्याच्या कॅमेऱ्यात कैद केला आहे.