सोनाली रमली निसर्गरम्य वातावरणात

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2016 16:15 IST2016-12-01T16:15:43+5:302016-12-01T16:15:43+5:30

सध्या सामान्य माणसांप्रमाणेच सेलेब्रिटीदेखील सोशल मीडियावर अपडेट करण्यास विसरत नाही. आता हेच पाहा ना, मराठी चित्रपटसृष्टीची आघाडीची अभिनेत्री सोनाली ...

Sonali Ramle in scenic environment | सोनाली रमली निसर्गरम्य वातावरणात

सोनाली रमली निसर्गरम्य वातावरणात

्या सामान्य माणसांप्रमाणेच सेलेब्रिटीदेखील सोशल मीडियावर अपडेट करण्यास विसरत नाही. आता हेच पाहा ना, मराठी चित्रपटसृष्टीची आघाडीची अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सध्या तिच्या आगामी चित्रपटाच्या चित्रिकरणामध्ये व्यग्र आहे. सोनाली नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते. त्यामुळे ती नेमकी कुठे आहे आणि काय करते याची माहिती तिच्या चाहत्यांना मिळत असते. कर्नाटक इथल्या हम्पी येथील निसर्गरम्य परिसरात सध्या सोनाली शुटिंग करत आहे. तिने तिच्या ट्विटर अकाऊंटवरुन तिथले फोटोही शेअर केले आहेत. निळभोर आकाश आणि हिरवेगार शेत तिने या फोटोमध्ये दाखवले आहे.मराठी चित्रपट सादरीकरणाची आणि विषयाची चौकट मोडून नव्या वळणावर येऊन पोहोचला आहे. नवीन प्रेक्षणीय लोकेशन्स आणि त्या अनुषंगाने कथानकाची मांडणी हे मराठी चित्रपटाचे वैशिष्ट्य अधोरेखित होऊ लागले आहे. याच कारणासाठी दिग्दर्शक प्रकाश कुंटे त्यांचा आगामी चित्रपट हंपीच्या वाटेवर घेऊन गेले आहेत. कर्नाटकातील ऐतिहासिक हंपी इथे चित्रीकरणास नुकतीच सुरुवात झालेल्या या चित्रपटाचे नाव ठरविणे अद्याप बाकी आहे. प्रकाश कुंटे यांनी दिग्दर्शित केलेल्या कॉफी आणि बरंच काही आणि अँड जरा हटके या चित्रपटांना प्रेक्षकांच्या पसंतीची पावती मिळाली होती, तसंच या चित्रपटांचं अनेक पातळींवर कौतुकदेखील झालं होतं. या चित्रपटात सोनाली कुलकर्णी, प्राजक्ता माळी, प्रियदर्शन जाधव, ललित प्रभाकर अशी उत्तम स्टारकास्ट पहायला मिळेल. अमलेंदु चौधरी सिनेमॅटोग्राफर असून, चित्रपटाची निर्मिती स्वरूप समर्थ एंटरटेन्मेन्टच्या योगेश निवृत्ती भालेराव करत आहेत. सोनाली यापूर्वी नटरंग, पोस्टर गर्ल, टाइमपास २, शटर अशा अनेक चित्रपटात प्रेक्षकांना पाहायला मिळाली.

{{{{twitter_post_id####}}}}

Web Title: Sonali Ramle in scenic environment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.