सोनाली-प्राजक्ता होणार मैत्रिणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2016 16:22 IST2016-12-31T16:15:51+5:302016-12-31T16:22:01+5:30
चित्रपटसृष्टीत दोन अभिनेत्री एकत्र आल्या की त्यांच्यातील कोल्डवार विषयीच जास्त बोलले जाते. दोन अभिनेत्री कधीही एकमेकींच्या चांगल्या मैत्रिणी होऊ ...

सोनाली-प्राजक्ता होणार मैत्रिणी
ित्रपटसृष्टीत दोन अभिनेत्री एकत्र आल्या की त्यांच्यातील कोल्डवार विषयीच जास्त बोलले जाते. दोन अभिनेत्री कधीही एकमेकींच्या चांगल्या मैत्रिणी होऊ शकत नाही असा गैरसमज असतो. परंतू अनेक अभिनेत्री चांगल्या मैत्रिणी असल्याचे आपण पाहीले आहे. आता सोनाली कुलकर्णी आणि प्राजक्ता माळी या दोन नव्या मैत्रिणी मराठी चित्रपटसृष्टीला मिळाल्याचे समजतेय. होय, प्राजक्ता आणि सोनाली या दोघीही एकदम बेस्ट फ्रेन्ड असल्याचे कळतेय. परंतू या दोघी रिअल लाईफ नाही तर रिल लाईफमध्ये एकमेकींच्या घनिष्ठ मैत्रिणि झाल्या आहेत. प्रकाश कुंटे दिग्दर्शित आगामी मराठी चित्रपटामध्ये प्राजक्ता आणि सोनाली या मेत्रिणींची भूमिका साकारत असल्याचे समजतेय. गिरीजा आणि इशा या नावाच्या भूमिका या दोघीही या चित्रपटात साकारणार असल्याचे कळतेय.
भरतनाट्यमची साडी घालुन साज-शृंगार केलेल्या वेषात प्राजक्ताने हंपीच्या प्रेक्षणीय स्थळांमध्ये स्वत:ला कॅमेºयात बंदिस्त करुन घेतले आहे. या चित्रपटामध्ये ललित प्रभाकर आणि प्रियदर्शन जाधव यांच्या देखील भूमिका आहेत. पहिल्यांदाच मराठी चित्रपटामध्ये हंपीचे सौंदर्य प्रेक्षकांना पाहता येणार आहे. एका वेगळ््या विषयावरील हा सिनेमा असल्याचे प्रकाश कुंटे यांनी सांगितलेच हाते. प्राजक्ताची एक महत्वपूर्ण भूमिका या चित्रपटात असल्याचे कळतेय. सोनाली कुलकर्णी आणि प्राजक्ता या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहेत. नुकतेच प्राजक्ताने या चित्रपटाचे हंपीतील चित्रीकरण पूर्ण केले आहे. प्राजक्ताने सोशल साईट्सवर हंपीतील काही शेअर केलेल्या फोटोमध्ये ती एकदमच कुल लुकमध्ये दिसत आहे. आता चित्रपटात देखील ती याच लुकमध्ये दिसणार का? हे मात्र अजुन तरी समजलेले नाही.
![]()