महाराजांबद्दलचे प्रेम, कौतुक, आदर, श्रद्धा, अभिमान; सोनाली कुलकर्णीची शिवजयंती निमित्तची पोस्ट चर्चेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2022 14:06 IST2022-02-19T14:03:32+5:302022-02-19T14:06:07+5:30
छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आज राज्यभर उत्साहात साजरी होत आहे.अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही सोशल मीडियाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना दिली आहे.

महाराजांबद्दलचे प्रेम, कौतुक, आदर, श्रद्धा, अभिमान; सोनाली कुलकर्णीची शिवजयंती निमित्तची पोस्ट चर्चेत
छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आज राज्यभर उत्साहात साजरी होत आहे. यानिमित्त ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती विदेशात असलेला मराठी माणूसही आपल्या राजाची जयंती धुमधडाक्यात आणि उत्साहात साजरी करतो. अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही सोशल मीडियाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना दिली आहे.
सोनालीने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे ज्यात तिच्या मागे शिवाजी महारांजाची मूर्ती दिसतेय. महाराजांबद्दलचे प्रेम, कौतुक, आदर, श्रद्धा, अभिमान, आपुलकी, हे सगळेच भाव @saneshashank ने अचूक टिपले या डोळ्यांमध्ये म्हाणून हा फोटो आज, इथे share करत आहे…कारण श्री छत्रपतींविषयी या सगळ्याच भावना आपण सगळेच share करतो ना. #शिवजयंती #जयभवानी #जयशिवराय🚩#छत्रपती_शिवाजी_महाराज असे हॅशटॅग तिने या पोस्टसोबत दिली आहे.
जय जिजाऊ जय शिवराय, शिव जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा,स्वराज्यातील तमाम रयतेला शिव जन्मोत्सवाच्या भगव्या शुभेच्छा, जय जिजाऊ जय शिवराय, अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त सर्व शिवभक्तांना हार्दिक शिवमय शुभेच्छा अशा कमेंट्स सोनालीच्या पोस्टवर चाहत्यांनी केल्यात.
सोनाली कुलकर्णी हिच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर नुकताच तिचा पांडू आणि झिम्मा हा चित्रपट रिलीज झाला आहे. या दोन्ही चित्रपटांना खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे. या दोन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला आहे. लवकरच ती व्हिक्टोरिया या चित्रपटात दिसणार आहे.