'शॉर्ट अँड स्वीट' चा ट्रेलर रिलीज, हटके स्टोरी अन् क्युट जोडीने वेधलं लक्ष; प्रेक्षकांमध्ये उत्सुकता

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2023 11:18 AM2023-10-20T11:18:37+5:302023-10-20T11:25:01+5:30

सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून चाहत्यांना हा हटके विषय खूपच आवडला आहे. 

Sonali Kulkarni starrer Short and Sweet trailer released different story and cute chemistry between sonali and shridhar watsar | 'शॉर्ट अँड स्वीट' चा ट्रेलर रिलीज, हटके स्टोरी अन् क्युट जोडीने वेधलं लक्ष; प्रेक्षकांमध्ये उत्सुकता

'शॉर्ट अँड स्वीट' चा ट्रेलर रिलीज, हटके स्टोरी अन् क्युट जोडीने वेधलं लक्ष; प्रेक्षकांमध्ये उत्सुकता

Short and Sweet Trailer: मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीची (Sonali Kulkarni)  मुख्य भूमिका असलेला 'शॉर्ट अँड स्वीट' हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होतोय. यामध्ये सोनालीसोबत श्रीधर वत्सर, हर्षद अटकरी आणि रसिका सुनील यांचीही मुख्य भूमिका आहे . सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून चाहत्यांना हा हटके विषय खूपच आवडला आहे. 

सिनेमाच्या ट्रेलरवरुन ही कथा थोडी कॉमेडी आणि थोडी भावूक अशी असणार असल्याचं दिसतंय. सोनाली हर्षद अटकरीच्या आईच्या भूमिकेत आहे. तर श्रीधर वत्सल हे त्याचे वडील आहेत. हे आपले वडील असल्याचं सत्य अनेक वर्षांनी हर्षदच्या समोर आलेलं असतं. आपले वडील असे बुटके आहेत हे पाहून त्याला विश्वासच बसत नाही. सोनाली मात्र हेच तुझे बाबा असल्याचं त्याला पटवून देत असते. रसिका सुनील हर्षदच्या गर्लफ्रेंडची भूमिका साकारत आहे. एकंदरच ही शॉर्ट अँड स्वीट लव्हस्टोरी कशी असणार आहे हे प्रेक्षकांना सिनेमा पाहून कळेलच.

सोनाली कुलकर्णीचेमराठी चित्रपट नेहमीच हटके विषयांवर असतात. 'गुलाबजामून' सिनेमानंतर ती आता 'शॉर्ट अँड स्वीट' मधून आपल्या भेटीला येत आहे. तर श्रीधर वत्सर यांनी हिंदी सिनेमा, थिएटर केलं आहे. पहिल्यांदाच ते मराठी सिनेमात काम करत आहेत. तर अभिनेता हर्षद अटकरी  मालिकांमध्ये काम केल्यानंतर पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर झळकत आहे. रसिका सुनीलचीही सिनेमातील भूमिका इंटरेस्टिंग आहे. ३ नोव्हेंबर रोजी सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.

Web Title: Sonali Kulkarni starrer Short and Sweet trailer released different story and cute chemistry between sonali and shridhar watsar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.