सोनाली कुलकर्णीने शेअर केला साडीतला तो फोटो, म्हणाली- तुला खूप miss करतेय

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2020 07:35 PM2020-06-12T19:35:43+5:302020-06-12T19:40:05+5:30

नटरंग या चित्रपटातील अप्सरा आली हे तिचे गाणे प्रचंड गाजले होते.

Sonali kulkarni shared her throwback saree pic on instagram | सोनाली कुलकर्णीने शेअर केला साडीतला तो फोटो, म्हणाली- तुला खूप miss करतेय

सोनाली कुलकर्णीने शेअर केला साडीतला तो फोटो, म्हणाली- तुला खूप miss करतेय

googlenewsNext

सोनाली कुलकर्णीने आज तिच्या मेहनतीने मराठी चित्रपटसृष्टीत तिचे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. तिने बकुळा नामदेव घोटाळे या चित्रपटाद्वारे चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. तिने मराठीत एकाहून एक हिट चित्रपट दिले असून हिंदी चित्रपटातही तिने काम केले आहे.  सोनाली सोशल मीडियाच्या माध्यामातून तिच्या फॅन्सच्या संपर्कात असते. तिच्या चित्रपटाचे चित्रीकरण कुठे सुरू आहे, ती चित्रीकरणातून वेळ काढून कुठे व्हेकेशनला गेली आहे या प्रत्येक गोष्टी सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या फॅन्सना सांगत असते.

सोनालीने तिच्या इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. सोनालीने तिचा साडीतले फोटो शेअर केले. चाहत्यांनीची भरभरून कमेंटस आणि लाईक्स देत तिच्या या फोटोला तुफान पसंती दिली आहे. या फोटोतसोबत साडी आणि साज़ खूप miss करतेय.... #हिरकणी तुला खूप miss करतेय आणि हे photos ज्या घरी काढलेयत, ते माझं पुण्याचं घर, खूप miss करतेय. असे कॅप्शन सोनालीने या फोटोसोबत दिले आहे.

नटरंग या चित्रपटातील अप्सरा आली हे तिचे गाणे प्रचंड गाजले होते. या चित्रपटानंतर तिला मराठी चित्रपटसृष्टीतील अप्सराच म्हटले जाते. तिने अंजिठा, पोस्टर गर्ल, झपाटलेला २, मितवा, क्लासमेट यांसारख्या चित्रपटांमध्ये दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत. बकुळा नामदेव घोटाळे या तिच्या पहिल्या चित्रपटासाठी तिला अनेक पुरस्कार देखील मिळाले होते.

Web Title: Sonali kulkarni shared her throwback saree pic on instagram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.