लाल रंगाच्या साडीत खुललं सोनालीचे सौंदर्य, फोटो व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2019 13:32 IST2019-08-27T13:22:09+5:302019-08-27T13:32:21+5:30
सोनाली कुलकर्णीने आतापर्यंत अनेक मराठी चित्रपटांमध्ये दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत. मराठीप्रमाणेच बॉलिवूडमध्येदेखील तिने आपले प्रस्थ निर्माण केले आहे.

लाल रंगाच्या साडीत खुललं सोनालीचे सौंदर्य, फोटो व्हायरल
सोनाली कुलकर्णीने आतापर्यंत अनेक मराठी चित्रपटांमध्ये दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत. मराठीप्रमाणेच बॉलिवूडमध्येदेखील तिने आपले प्रस्थ निर्माण केले आहे. सोशल मीडियावर सोनाली कुलकर्णी नेहमीच अॅक्टिव्ह असते. ती आपल्या फॅन्ससोबत नेहमीच वेगवेगळ्या अंदाजातील फोटो शेअर करत असते. तिच्या अभिनयासह तिचं सौंदर्य आणि अदा रसिकांना भावल्या आहेत.
सोनालीने तिचा लाल साडीतला फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोतील तिचा सिंपल लूक चाहत्यांच्या चांगला पसंतीस उतरला आहे. सोनालीच्या या फोटोवर फॅन्सकडून लाईक्स आणि कमेंट्स भरपूर मिळाल्या आहेत. लाल रंगाच्या साडीत सोनालीचे सौंदर्य आणखीनच खुलून आल्याचे दिसून येत आहे. सोनाली आपल्या लूक, स्टाइल आणि फॅशनाबाबत नेहमीच जास्त सजग असते.
सोनाली कुलकर्णी हे नाव आज मराठी चित्रपटसृष्टीत अतिशय महत्त्वाचे मानले जाते. दिल चाहता है हा चित्रपट सोनालीच्या करियरचा टर्निंग पॉईंट ठरला. या चित्रपटाने तिला खऱ्या अर्थाने ओळख मिळवून दिली.
काही दिवसांपूर्वी सोनाली सलमान खानच्या भारत या सिनेमात दिसली होती. यात तिने सलमानच्या आईची भूमिका साकारली होती. बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने चांगला गल्ला जमावला होता. मराठीमध्ये सोनाली शेवटची गुलाबजाम सिनेमात दिसली होती.