महामॅरेथॉनमध्ये सोनाली कुलकर्णी आणि ललित प्रभाकरने नाशिककरांना केले चिअरअप!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2017 15:00 IST2017-10-08T09:30:00+5:302017-10-08T15:00:00+5:30
नाशिककरांमधील उत्साह, जल्लोष आणि एनर्जी बघून भारावून गेलेल्या अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिच्यासह अभिनेता ललित प्रभाकर यांनी नाशिककरांना चिअर करीत ...
महामॅरेथॉनमध्ये सोनाली कुलकर्णी आणि ललित प्रभाकरने नाशिककरांना केले चिअरअप!
न शिककरांमधील उत्साह, जल्लोष आणि एनर्जी बघून भारावून गेलेल्या अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिच्यासह अभिनेता ललित प्रभाकर यांनी नाशिककरांना चिअर करीत महामॅरेथॉनमध्ये त्यांचा उत्साह वाढविला. उगवत्या दिनकराच्या साक्षीने सुरू झालेल्या या महामॅरेथॉनमध्ये नाशिकसह, गुजरात, अहमदाबाद, सुरत, दिल्ली येथील धावपटू सहभागी झाले होते. त्याचबरोबर विदेशी धावपटूंनीही एकच धाव घेत स्पर्धेचा उत्साह द्विगुणित केला. दरम्यान, नाशिककरांच्या उत्साहाला दाद देण्यासाठी पाहोचलेल्या सोनालीने ‘भागो रे’ म्हणत नाशिककरांना चिअरअप केले.
![]()
सोनाली तिच्या आगामी ‘हम्पी’ या चित्रपटाच्या टीमसह महामॅरेथॉनस्थळी पोहोचली होती. तिने धावपटूंना झेंडा दाखवून त्यांचे मनोबल वाढविले. यावेळी अभिनेता ललित प्रभाकर याच्यासह निर्माता योगेश भालेराव उपस्थित होते. नाशिककरांमधील उत्साह आणि एनर्जी बघून सोनाली अक्षरश: भारावून गेली होती. लहानांपासून ते वयोवृद्धांपर्यंत नाशिककर या महामॅरेथॉनमध्ये सहभागी झाल्याने हा एक महाकुंभमेळा असल्याचे उद्गार तिने काढले, तर ललित प्रभाकर याने नाशिककरांमधील शिस्तीचे अन् महामॅरेथॉनप्रती असलेल्या उत्साहाचे कौतुक केले.
![]()
यावेळी सोनाली आणि ललितबरोबर महामॅरेथॉनमध्ये सहभागी झालेल्या धावपटूंनी सेल्फीचा आनंदही घेतला. त्याचबरोबर नाशिककरांच्या आग्रहाखातर तिने ‘झिंग झिंग झिंगाट’वर एकच ठेका धरला. यावेळी उपस्थित नाशिककरांनीही सोनालीबरोबर ठेका धरत स्पर्धेत उत्साह वाढविला. सोनालीने तिच्या आगामी ‘हम्पी’ या चित्रपटाचे प्रमोशन केले. तसेच ‘लोकमत’ जेव्हा-जेव्हा महामॅरेथॉनचे आयोजन करणार तेव्हा मी नक्कीच नाशिककरांचा उत्साह वाढविण्यासाठी येणार असल्याचा शब्दही तिने दिला.