सोनालीने का केले फोटोशूट?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2016 17:33 IST2016-11-24T16:57:50+5:302016-11-24T17:33:31+5:30
सध्या प्रत्येक कलाकार फोटोशूट करण्यासाठी उत्सुक दिसत असल्याचे पाहायला मिळत आहे. प्रत्येक कलाकाराचे फोटोशूट असलेले काही फोटो सोशल मीडियावर ...
सोनालीने का केले फोटोशूट?
स ्या प्रत्येक कलाकार फोटोशूट करण्यासाठी उत्सुक दिसत असल्याचे पाहायला मिळत आहे. प्रत्येक कलाकाराचे फोटोशूट असलेले काही फोटो सोशल मीडियावर झळकत असतात. या कलाकारांसाठी फोटोशूट हे खूप महत्वाचे असते. कारण फोटोशूटच्या माध्यमातून कलाकारांचे विविध लूक पाहायला मिळत असतात. काही कलाकार आगामी प्रोजेक्टसाठी तर काही विविध मॅगझीनसाठी फोटोशूट करत असतात. आता हेच पाहा ना, अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने एक इंग्रजी मॅगझीनसाठी नुकतेच फोटोशूट केले आहेत. या फोटोशूटविषयी सोनाली लोकमत सीएनएक्सला सांगते, हो, हे फोटोशूट एका इंग्रजी मॅगझीनसाठी केले आहे. एका इंग्रजी मॅगझीनच्या कव्हर स्टोरीसाठी माझी निवड केल्याने खूप आनंद होत आहे. कारण या मॅगझीनच्या कव्हरस्टोरीवर आतापर्यत खूप कमी मराठी कलाकार पाहायला मिळाले. मात्र या नवीन वर्षासाठी माझी निवड केल्याने जणू काही मला नवीन वर्षाचे गिफ्टच मिळाले आहे. हे फोटोशूट खूपच इंटरेस्टिंग झाले आहे. तसेच हे फोटोशूट अत्यंत स्टाइलिश पध्दतीने करण्यात आले आहे. या शूट दरम्यान मी खूप धमाल केली. आता ही कव्हरस्टोरी कधी झळकणार या गोष्टीची वाट पाहत आहे. हे फोटो फोटोग्राफर संकेत देशपांडे यांनी कॅमेरात कैद केले आहेत. त्यामुळे सोनालीची नवीन वर्षाची सुरूवात उत्तम होणार असल्याचे दिसून येत आहे. या फोटोशुटमधील काही फोटो तिने सोशलमीडियावर अपलोड केले आहेत. तिच्या या फोटोला सोशल मीडियावर भरभरून लाइक्स आणि कमेंन्ट पाहायला मिळत असल्याचे दिसत आहे. सोनालीने यापूर्वी नटंरग, पोस्टर गर्ल, मितवा, रमा माधव, क्षणभर विश्रांती, क्लासमेट अशा अनेक चित्रपटातून प्रेक्षकांना पाहायला मिळाली आहे. तसेच तिच्या अप्सरा अली या गाण्याने प्रेक्षकांच्या मनावर आधिराज्य गाजविले आहे.