सोनाली करणार, दिल दिमाग और बत्ती
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2016 12:39 IST2016-08-04T07:04:59+5:302016-08-04T12:39:52+5:30
Exculsive - बेनझीर जमादार बॉलीवुड व मराठी इंडस्ट्रीमध्ये आपल्या अभिनयाची छाप पाडणारी सुंदर अभिनेत्री सोनाली ...

सोनाली करणार, दिल दिमाग और बत्ती
बॉलीवुड व मराठी इंडस्ट्रीमध्ये आपल्या अभिनयाची छाप पाडणारी सुंदर अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ही आता, दिल, दिमाग और बत्ती करण्यास सज्ज झाली आहे. घाबरू नका, सोनाली कोणाची बत्ती गुल करणार नाही तर तिच्या आगामी चित्रपटाचे नाव असल्याचे सोनालीने लोकमत सीएनएक्सशी बोलताना सांगितले. सोनाली म्हणाली, ऋषिकेश गुप्ते दिग्दर्शित दिल दिमाग और बत्ती या चित्रपटामध्ये सध्या व्यस्त आहे. या चित्रपटाचे शुटिंग चालू होऊन एक ते दीड महिना झाला आहे. या चित्रपटात मी एका अनोख्या भूमिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. कारण अशा भूमिकेत मला प्रेक्षकांनी पूर्वी कधी ही पाहिले नाही. प्रेक्षकांसाठी माझी ही भूमिका पूर्णपणे सरप्राईज असणार आहे. या चित्रपटामध्ये माझ्यासोबत वंदना गुप्ते, दिलीप प्रभावळकर, पुष्कर असे अप्रतिम कलाकार झळकणार आहे. या चित्रपटात एक असे गाणे आहेत की, त्यामध्ये बरेच कलाकार एकत्रित देखील पाहायला मिळणार आहे. तसेच या चित्रपटामुळ्े माझा जुना व चांगला मित्र उमेश जाधवसोबत काम करण्याची संधी मिळाली. तो खूप चांगला व आघाडीचा नृत्यदिग्दर्शक आहे. या चित्रपटाची शुटिंग सप्टेबर अखेरीस पर्यत संपेन. असो, पण चित्रपटाच्या नावावरून बहुधा कॉमेडी चित्रपट असण्याची शक्यता आहे. तसेच या चित्रपटातील स्टारडम पाहून दिल, दिमाग और बत्ती हा चित्रपट प्रेक्षकांना खळखळून हसण्यासाठी येत आहे अशी अपेक्षा करण्यात काही हरकत नाही.