सोनाली बनली रखुमाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2016 12:47 IST2016-07-11T07:17:51+5:302016-07-11T12:47:51+5:30

   प्रियांका लोंढे                पोश्टर गर्ल या चित्रपटामध्ये आपण सर्वांनीच अप्सरा सोनालीला रखुमाईच्या ...

Sonali became Rukmai | सोनाली बनली रखुमाई

सोनाली बनली रखुमाई

  <
em> प्रियांका लोंढे
               पोश्टर गर्ल या चित्रपटामध्ये आपण सर्वांनीच अप्सरा सोनालीला रखुमाईच्या अवतारात पाहिलेच होते. त्या चित्रपटात सोनाली खरी रखुमाई जरी झाली नसली तरी तिने एका शॉटसाठी कमरेवर हात देऊन रखमाईच्या आवेशात दिलेली ती पोझ कोणीच विसरु शकणार नाही. त्याच चित्रपटातील रखुमाई रखुमाई हे गाणे आजही सर्वांच्याच ओठी ऐकु येते.  पुन्हा एकदा आपली ही गोड अभिनेत्री रखुमाई झाली आहे. आता तुम्हाला वाटेल कोणत्या चित्रपटामध्ये सोनाली रखुमाईची भुमिका साकारणार आहे का तर तसे बिलकुल नाहीये. सोनाली रखुमाई झालीये ती एका कार्यक्रमाच्या निमित्ताने. लाल रंगाची काठापदरी साडी, हातात हिरवा चुडा, कपाळी कुंकू, नाकात नथ, कानात झुमके, गळ््यात साज असा शृंगार करुन सोनालीने मस्त रखुमाईच्या पोझ मध्ये फोटो काढले आहेत. सोशल नेटवर्कींग साईट्सवर आपल्या या रखुमाईचे फोटोज वायरल झाले असुन तिच्या चाहत्यांनी त्यांना अनेक हिट्स देखील दिले आहेत. कार्यक्रमाच्या निमित्ताने का होईना पण सोनालीचे रखमाईच्या रुपातील दर्शन पुन्हा एकदा सर्वांनाच घडले. ते काहीही असो पण आपली ही मराठमोळी अभिनेत्री रखुमाईच्या साजशृंगारात खुपच सुंदर दिसते यात मात्र शंका नाही. 

Web Title: Sonali became Rukmai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.