"मन तुझं जलतरंग...", मराठी कवितेवर इंग्लंडच्या रस्त्यांवर बिनधास्त नाचली सोनाली कुलकर्णी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2025 11:44 IST2025-07-05T11:43:38+5:302025-07-05T11:44:08+5:30

मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीलाही या गाण्याची भुरळ पडली आहे. सोनालीने "मन तुझं जलतरंग..." गाण्यावर रील बनवला आहे.

sonalee kulkarni reel video on man tuz jaltarang song dance on england street | "मन तुझं जलतरंग...", मराठी कवितेवर इंग्लंडच्या रस्त्यांवर बिनधास्त नाचली सोनाली कुलकर्णी

"मन तुझं जलतरंग...", मराठी कवितेवर इंग्लंडच्या रस्त्यांवर बिनधास्त नाचली सोनाली कुलकर्णी

एका मराठी कवितेने सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. "मन तुझं जलतरंग, लहरी तुझा साज" ही वैभव जोशींची कविता सोशल मीडियावर ट्रेंडिंगमध्ये आहे. या कवितेचे बोल आणि संगीत हे कानांना तृप्त करणारं आणि मनाला भुलवणारं आहे. त्यामुळेच या कवितेवर रील बनवण्याचा मोह अनेकांना आवरता आलेला नाही. 

मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीलाही या गाण्याची भुरळ पडली आहे. सोनालीने "मन तुझं जलतरंग..." गाण्यावर रील बनवला आहे. सध्या सोनाली इंग्लंडमध्ये आहे. युरोपियन महाराष्ट्रीयन संमेलनासाठी ती गेली आहे. तिथेच तिने इंग्लंडच्या रस्त्यावर "मन तुझं जलतरंग..." या मराठी कवितेवर रील बनवला आहे. सोनालीने ट्रेडिशनल लेहेंगा घातल्याचं व्हिडिओत दिसत आहे. या रीलमध्ये ती बिनधास्तपणे इंग्लंडच्या रस्त्यांवर डान्स करताना दिसत आहे. "व्हायरल कवितेवर रील केलं नाही तर पाप लागेल…आणि ती संधी इथे इंग्लंडमध्ये युरोपियन मराठी संमेलनच्या निमित्ताने मिळत असेल तर का बरं सोडावी", असं कॅप्शन तिने व्हिडिओला दिलं आहे. 


सोनाली कुलकर्णी ही मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. 'बकुळा नामदेव घोटाळे' या सिनेमातून तिने पदार्पण केलं होतं. त्यानंतर अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये तिने काम केलं आहे. 'हिरकणी' या ऐतिहासिक सिनेमात ती दिसली होती. 

Web Title: sonalee kulkarni reel video on man tuz jaltarang song dance on england street

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.