सोनाली कुलकर्णीने परदेशातील या ठिकाणी केला वाढदिवस साजरा, शेअर केला व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2025 19:57 IST2025-05-20T19:57:15+5:302025-05-20T19:57:39+5:30

Sonalee Kulkarni : अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने १८ मे रोजी ३७ वा वाढदिवस साजरा केला.

Sonalee Kulkarni celebrated her birthday at this place abroad, shared a video | सोनाली कुलकर्णीने परदेशातील या ठिकाणी केला वाढदिवस साजरा, शेअर केला व्हिडीओ

सोनाली कुलकर्णीने परदेशातील या ठिकाणी केला वाढदिवस साजरा, शेअर केला व्हिडीओ

मराठी कलाविश्वातील अप्सरा म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी (Sonalee Kulkarni) सतत चर्चेत येत असते. नुकतेच अभिनेत्रीने १८ मे रोजी ३७ वा वाढदिवस साजरा केला. सोशल मीडियावर चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. त्यानंतर तिने व्हिडीओ शेअर करत चाहत्यांचे आभारदेखील मानले. त्यानंतर आता तिने एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यात तिने परदेशातील एका ठिकाणी तिचा वाढदिवस साजरा केल्याचे सांगितले. सध्या सोनाली किर्गिस्तान येथे आहे. 

सोनाली कुलकर्णीने इंस्टाग्रामवर व्हिडीओ शेअर केला आहे. सध्या ती किर्गिस्तानमध्ये आहे. तिथला निसर्गरम्य परिसर तिने दाखवला आहे. तिने हा व्हिडीओ शेअर करत लिहिले की, #kokjaiykvalley च्या कुशीत वाढदिवस साजरा केला. किर्गिस्तानमध्ये किर्गिझ भटक्यासारखे राहणे. दिवसभरात नवीन देश, ग्रामीण भाग एक्सप्लोर करणे, हायकिंग, वाचन, स्थानिक अन्न खाणे, पाऊस, बर्फ, सूर्यप्रकाश अनुभवणे यासारख्या माझ्या आवडत्या गोष्टी करतेय. माझ्या बर्थडे वीकसाठी या सुंदर, शांत, असामान्य सहलीचे नियोजन केल्याबद्दल @munirtravel.kg चे आभार. सोनालीच्या या व्हिडीओला चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे. 


सोनाली कुलकर्णीने वाढदिवशी खास बीच व्हेकेशन फोटो शेअर केले होते. यात ती बिकिनीत पाहायला मिळाली. तिच्या बिकिनी लूकमधील फोटोंनी लक्ष वेधले होते. यावेळी तिने दिलेल्या कॅप्शननेही नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले. तिने लिहिले होते की, 'Coz “it” is getting hotter and younger?' तिच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर सोनाली बऱ्याच मोठ्या काळापासून कोणत्या सिनेमात झळकलेली नाही. तिचे चाहते तिच्या आगामी प्रोजेक्टची वाट पाहत आहेत.

Web Title: Sonalee Kulkarni celebrated her birthday at this place abroad, shared a video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.