‘लोकमत महाराष्ट्रीय आॅफ द इयर २०१७’ सोहळ्याचे काही ‘लाईव्ह’ क्षण...
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2017 22:26 IST2017-04-11T13:09:19+5:302017-04-11T22:26:18+5:30
ज्या सोहळ्याकडे तमाम महाराष्ट्राचे लक्ष लागले होते. त्या ‘लोकमत महाराष्ट्रीय आॅफ द इयर २०१७’ पुरस्कार सोहळ्याच्या चौथ्या पर्वाला प्रारंभ झालाय.
.jpg)
‘लोकमत महाराष्ट्रीय आॅफ द इयर २०१७’ सोहळ्याचे काही ‘लाईव्ह’ क्षण...
ज या सोहळ्याकडे तमाम महाराष्ट्राचे लक्ष लागले होते. त्या ‘लोकमत महाराष्ट्रीय आॅफ द इयर २०१७’ पुरस्कार सोहळ्याच्या चौथ्या पर्वाला प्रारंभ झालाय. सत्ता, कर्तृत्व आणि ग्लॅमर असा त्रिवेणी संगम असलेल्या या सोहळ्याचे काही ‘लाईव्ह’ क्षण आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. रंगभूमी आणि मनोरंजन क्षेत्रातील अनेक तारे-तारका या सोहळ्याची रंगत वाढवण्यासाठी उपस्थित आहेत. संपूर्ण महाराष्ट्राला नाही तर अख्ख्या देशाला ‘झिंगाट’ करणारी आर्ची अर्थात रिंकू राजगुरू, आपल्या निखळ सौंदर्याच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी ‘चुलबुली’ आलिया भट्ट, आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकणारा बॉलिवूडचा हँडसम बॉय रणबीर कपूर अशा सगळ्यांच्या साक्षीने रंगलेल्या या सोहळ्याची मनोरंजनाशी निगडीत काही क्षणचित्रे खास तुमच्यासाठी....
या भूमीशी ज्यांनी रक्ताचे आणि घामाचे नाते जोडले, ज्यांनी आपले आयुष्य इथल्या समृद्धीसाठी वेचले, अशा महाराष्ट्रीयनांचा सन्मान करण्यासाठी लोकमतने सुरू केलेल्या 'महाराष्ट्रीयन ऑफ दी इयर' पुरस्कार सोहळ्याला दिमाखात सुरुवात झाली आहे. आपल्या उत्तुंग कर्तृत्वाने समाजाला दिशा आणि प्रेरणा देण्याचा वसा घेतलेल्या सेवाव्रतींचा गौरव करण्याच्या 'लोकमत'च्या संकल्पाचे चौथे पर्व यंदा साकारत आहे.
![]()
सुप्रसिद्ध नृत्यांगणा आणि अभिनेत्री शर्वरी जेमनीस यांच्या गणेव वंदनेनं कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे.
मल्लखांब ही महाराष्ट्राच्या मातीत रूजलेली कला...‘लोकमत महाराष्ट्रीय आॅफ द इयर २०१७’च्या व्यासपीठावर महाराष्ट्रातील काही क्रिडापटूंनी मल्लखांबाचे चित्तथरारक प्रदर्शन घडवले...
![]()
दिग्गजांची मांदियाळी लोकमतच्या अविस्मरणीय सोहळयात
गजेन्द्र चौहान याने आपल्या सूरांनी सगळ्यांना मंत्रमुग्ध केले. तुला भीती कशाची...चल रे गड्या...या गजेन्द्रच्या आवाजातील गाण्याने सगळ्यांनाच मोहिनी घातली...
दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांचे आगमन...
अभिनेत्री सुकन्या कुलकर्णी यांना मराठी रंगभूमीवरील योगदानासाठी (महिला कॅटेगरी) यंदाच्या लोकमत महाराष्ट्रीयन आॅफ द इयर पुरस्काराने गौरविण्यात आले. या पुरस्कारानंतर सुकन्या यांनी लोकमतचे हृदय आभार मानले.
एन्टरन्टेन्मेंट क्षेत्रातील ट्रेंडसेटर्सचा लोकमत महाराष्ट्रीय आॅफ इयर हा पुरस्कार नागराज मंजुळे यांना प्रदान करण्यात आला.
![]()
रामदास आठवले यांनी मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांची मुलाखत घेतली. राजकारणात कधी कधी थापा माराव्या लागतातच. पत्नी अमृता यांच्यासमोर मारलेली कधी अशीच मारलेली एखादी थाप आठवते का? असा प्रश्न त्यांनी मुख्यमंत्र्यांना विचारला. यावर बायकोसमोर कुठलीच थाप पचत नाही. माझी थाप पचली असे कुणी सांगत असेल तर तो सर्वांत मोठा थापाड्या आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. त्यांच्या या उत्तराने उपस्थितांमध्ये एकच खसखस पिकली.
![]()
अभिनेता रणबीर कपूरला लोकमत महाराष्ट्रीयन आॅफ द इयर पुरस्कार-2017 मधील आऊटस्टॅडिंग एन्टरटेनर आॅफ द इयर (पुरुष) कॅटेगरीतील पुरस्काराने गौरविण्यात आले. पुरस्कार स्वीकारल्यानंतर ह्यकसं काय मुंबईह्णअशी साद रणबीरने घातली. मुंबईनेच मला घडवल, असे सांगत त्याने लोकमतचे विशेष आभार मानले.
आमिर खान अन् माझ्यात फक्त ‘हाईट’चा फरक आहे. बाकी काहीही नाही, असे रणबीर कपूर यांनी लोकमत समूहाचे सहव्यवस्थापकीय संचालक ऋषी दर्डा यांच्या एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. संजय दत्तच्या बायोपिकमध्ये काम करणे आव्हानात्मक आहे. रोज पाच तास मेकअपमध्ये जातात. पण मज्जा येते. जितेन्द्रची डान्स स्टाईल मला आवडते. त्यांना पडद्यावर जिवंत करता आले तर मला आवडेल, असेही रणबीर म्हणाला.
![]()
अभिनेत्री आलिया भट्ट हिला लोकमत महाराष्ट्रीयन आॅफ द इयर पुरस्कार-2017 मधील आऊटस्टॅडिंग एन्टरटेनर आॅफ द इयर (महिला) कॅटेगरीतील पुरस्काराने आलियाला गौरवण्यात आले.
चुलबुली आलिया भट्ट आणि रणबीर कपूर ‘लोकमत महाराष्ट्रीय आॅफ द इयर २०१७’च्या व्यासपीठावर एकत्र आलेत . लोकमत समूहाचे सहव्यवस्थापकीय संचालक ऋषी दर्डा यांनी त्यांना बोलते केले. यावेळी मी मुंबईची मराठी मुलगी असल्याचे आलिया म्हणाली. रणबीरला पहिल्यांदा भेटले तेव्हा मी ११ वर्षांचे होते. रणबीर संजय लीला भन्साळींना अस्टिस्ट करत होता. त्यावेळी काही वाटले नाही. पण ‘सावरियां’मध्ये रणबीरला पाहिले अन् मी त्याच्यावर लट्टू झाले, असे आलिया म्हणाली. रणबीरची ‘बर्फी’मधली भूमिका बेस्ट होती, असेही तिने सांगितले.